Rahul Gandhi Abhijit Pawar
Rahul Gandhi Abhijit Pawar 
Loksabha 2019

RahulWithSakal : काश्मिरमध्ये आम्ही शांतता प्रस्थापित केली होती : राहुल गांधी

सकाळवृत्तसेवा

प्रश्‍न : काश्‍मीर प्रश्‍नाबाबत तुमची भूमिका काय आहे? 

उत्तर : २०१४ मध्ये आम्ही जेव्हा सत्तेवरून दूर झालो तेव्हा तसे पाहिले तर जम्मू-काश्‍मीरमध्ये सर्वार्थाने शांतता होती. त्यावर आम्ही नऊ वर्षे काम केले आहे. जम्मू-काश्‍मिरातील लोकांशी दृढसंबंध निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. मी तेथे उद्योग नेले. महिलांचे स्वयंसाह्यता गट तयार केले. तरुणांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न केले. तेथे आम्ही शांततेत पंचायत निवडणुका घेतल्या. सर्वार्थाने तेथे शांतता नांदून तेथील दहशतवादाचे कंबरडे मोडले.

श्रीनगरला दररोज विमानांच्या पंधरा फेऱ्या होत होत्या. पर्यटनवाढीला लागले होते. अर्थकारणाला चालना मिळाली होती. नरेंद्र मोदी आले आणि त्यांनी ‘पीडीपी’शी संधिसाधू आघाडी केली, त्याने भारताच्या व्यूहरचनात्मक बाबींत मोठा गोंधळ निर्माण केला. त्यांनी दहशतवाद्यांना काश्‍मीरचा दरवाजाचा खुला करून दिला. त्याची त्यांनी उत्तरे दिली पाहिजेत.

सीआरपीएफचे जवान मारले गेले. पाकिस्तानला जे पाहिजे ते त्यांनी केले, पण नरेंद्र मोदी यांची ही जबाबदारी होती की त्यापासून सर्वांचे रक्षण करणे. पण चर्चा काहीच झाली नाही. उलट जो कोणी याबाबत प्रश्‍न विचारेल त्याला देशविरोधी समजले गेले.

मुंबईवर जेव्हा दहशतवादी हल्ला होत होता, इमारतींच्या आत लोक मारले जात होते, तेव्हा नरेंद्र मोदी बाहेर स्वतःच्या प्रसिद्धीच्या कार्यक्रमात मग्न होते, याचीही मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो. तिथे उभे राहून ते हॉटेलच्या आत सुरू असलेल्या हिंसाचाराचा पूर्ण फायदा उठवत होते, पत्रकार परिषदा घेत होते. सगळ्यांनाच हे आठवते. अशा रीतीने दहशतवादी हल्ल्यांचा राजकीय फायदाही उठवता येऊ शकतो. पुलवामाचा हल्ला झाला त्या वेळची माझी भूमिका अत्यंत सुस्पष्ट होती. मी म्हणालो, काँग्रेस याविषयी एक शब्दही बोलणार नाही. विषय संपला. यापुढे चर्चा नाही; पण तो हल्ला झाल्यापासून प्रत्येक दिवशी नरेंद्र मोदी त्या हल्ल्याचा राजकीय उपयोग करीत आहेत. आपल्या जवानांना राजकारणासाठी वापरण्याला माझा विरोध आहे. जेव्हा ते एखादी कारवाई करतात, तेव्हा त्या कारवाईचे पूर्ण श्रेय त्यांचे असते; राजकीय नेत्यांचे किंवा राजकीय पक्षांचे नाही. लष्कराकडून कारवाई केली जाते, त्यांच्याबद्दल अभिमान आहे, ते सक्षम आहेत, कारवाईचे श्रेय त्यांचेच आहे आणि ते त्यांनाच मिळाले पाहिजे.

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत. काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा, जीएसटी, काश्‍मीर, राष्ट्रवादाचा मुद्दा, हिंदुत्व अशा अनेक विषयांवर राहुल गांधी यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याशी मनमोकळी बातचीत केली. काँग्रेसची धोरणे, पुढची वाटचाल याविषयी बोलताना काँग्रेसच गरिबांना ‘न्याय’ देईल, यावर गांधी यांनी भर दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: कॉंग्रेसमध्ये आता अशी वेळ आली आहे की, ते कोणाचेच ऐकत नाहीत - राजकुमार चौहान

SCROLL FOR NEXT