Loksabha 2019

Loksabha 2019 : रामटेकसाठी काँग्रेस नेत्यांमध्येच घमासान 

सकाळवृत्तसेवा

नागपूर - सोमवारपासून उमेदवारी दाखल करायची असून, रामटेक व चंद्रपूरच्या जागेसाठी दिल्लीत जोरदार घमासान सुरू आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघावर माजी खासदार तसेच कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक आणि अनुसूचित जाती-जमाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांनी दावा केला आहे. 

पहिल्या टप्प्यात मतदान असलेल्या मतदारसंघांची नावे शनिवारपर्यंत जाहीर केली जातील, अशी आशा व्यक्त केली जात होती. कॉंग्रेसने नागपूर लोकसभेसाठी नाना पटोले यांचे नाव जाहीरसुद्धा केले आहे. नागपूरच्या शेजारीच असलेला रामटेकचा निर्णय मात्र राखून ठेवला आहे. वासनिक रामटेकमधून एकदा निवडून आले, तर दुसऱ्यांना पराभूत झाले. वासनिक मतदारसंघ आणि मतदारांच्या संपर्कात राहत नसल्याने पराभूत झाल्याचा दावा त्यांचे पक्षाअंतर्गत विरोधक करतात. त्यांना राष्ट्रीय राजकारण आणि संघटन कार्यात जास्त स्वारस्य आहे. ते पक्षाचे सरचटणीससुद्धा असून, त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांनी रामटेकचा हक्क सोडून द्यावा, असा सल्लाही राऊत समर्थक त्यांना देत आहेत. 

जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या बैठकीत नितीन राऊत यांचे नाव येताच खळबळ उडाली होती. राऊत नागपूरचे आहेत. त्यांचे रामटेकमध्ये काय काम, असा विरोध कार्यकर्त्यांनी बैठकीत केला होता. सावनेरचे आमदार सुनील केदार यांच्या समर्थकांनी त्यांचे नाव पुढे केल्याची चर्चा होती. त्यांनी राऊत यांच्या नावाची घोषणाही केली होती. यावरून वासनिक आणि केदार समर्थक उभे ठाकले होते. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी सर्वांच्याच समर्थकांना बोलण्याची संधी दिल्याचा दावा केला होता. जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडून मात्र मुकुल वासनिक यांचेच नाव रामटेकचे उमेदवार म्हणून पाठवले होते. 

नावांमध्ये फेरफारीची शक्‍यता 
कॉंग्रेसच्या पहिल्या यादीत विदर्भातील नागपूरमधून नाना पटोले आणि गडचिरोलीतून नामदेव उसेंडी या दोघांचीच नावे जाहीर केली आहे. चंद्रपूरमधून आशीष देशमुख, वर्धा येथून महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांची नावे निश्‍चित झाल्याचे बोलले जात होते. मात्र, अद्यापही नावे जाहीर केली जात नसल्याने नावांमध्ये फेरफार होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

Poha Chila Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

SCROLL FOR NEXT