Ranjitsinh-Mohite-Patil
Ranjitsinh-Mohite-Patil 
Loksabha 2019

LokSabha 2019 : राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का; रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये!

सकाळवृत्तसेवा

अकलूज : खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील उद्या भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहिर कऱण्यात आले. अकलूज येथे झालेल्य जाहिर सभेत रणजितसिंह यांनी याची घोषणा केली. यावेळी विजयसिंह मोहिती पाटील देखील उपस्थित होते. उद्या बुधवारी (ता. 20) दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. 

रणजितसिंहांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. अकलूज येथे झालेल्या जाहीर सभेत रणजितसिंहांनी ही घोषणा केली. यावेळी पाटील म्हणाले, राज्यसत्तेचा वापर समान्य माणसाला मोठे करण्यासाठी झाला पाहिजे. अशीच भूमिका आमची राहिली आहे आणि हे संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. आज राजकारण कशा पद्धतीने चालले याची जाणीव माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आहे. राजकारण सत्ता मिळविण्यासाठीच करायचे ही आमची भूमिका कधीच नव्हती. वडिलांनी मुलाच्या हातात राजकारणाची सुत्र देण्यासाठी ही सभा नाही. गेल्या दहा वर्षापासून पुढच्या पिढीचे भविष्य घडणारी योजना पडून आहे. याचा दहा जिल्ह्यांचा ही योजना महत्त्वाची आहे. त्या योजनेचा वापर सत्तेसाठी केला पाहिजे. मागील दहा वर्षापासून योजनेची चेष्ठा सुरु आहे. 

भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांना ही योजना समजून सांगितले आहे. शेतकऱ्याचा, पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आजची सभा आहे. विजयसिंह मोहती पाटील सत्तेत नसताना देखील अनेक योजना आपल्या जिल्ह्यांसाठी घेऊन आले आहेत. रेल्वे, रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पुढील काळात लोकांना रोजगार हमी योजनेत जायचे नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीच हे प्रश्न सोडवू शकतील. राज्यातील देंवेद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुरेश प्रभू, गिरीष महाजन हे सोडवतील. 
भाजप मध्ये जाण्याचा निर्णय घ्यायचा का हे आता जनतेने सांगावे.... उद्या साडेबारा वाजता वानखेडे स्टेडीअम जवळील गरवारे जिमखाना येथे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी वेळ दिली आहे. तेथे सर्वांनी उपस्थित रहावे. आपण दिलेल्या आशिर्वादाची जाण ठेऊन मरेपर्यंत हा रणजितसिंह काम करीण.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT