congress
congress 
Loksabha 2019

Loksabha 2019 : उमेदवार ठरवताना काँग्रेसची दमछाक; भाजपला आव्हान कधी देणार?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा विजयरथ रोखण्यासाठी काँग्रेसचे देशभरात कसून प्रयत्न सुरू असले, तरीही हरियानातील निवडणूक ही पक्षश्रेष्ठींसमोर डोकेदुखी ठरू लागली आहे. हरियानामध्ये लोकसभेच्या एकूण दहा जागा आहेत. या राज्यात दहा उमेदवार निश्‍चित करतानाही काँग्रेसची दमछाक होत आहे. 

यासंदर्भात 'हिंदुस्तान टाईम्स'ने हरियाना काँग्रेसमधील सूत्रांच्या माहितीवर आधारित वृत्त प्रसिद्ध केले आहे. जिंदमधील पोटनिवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर हरियानातील अनेक वरिष्ठ नेते लोकसभेच्या रिंगणातून माघार घेऊ लागले आहेत. हरियानामध्ये गेली अनेक वर्षे काँग्रेसला पक्षांतर्गत मतभेदांनी सतावले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हरियानातील सर्व गटांना एकत्र आणण्याचा केंद्रीय नेतृत्त्वाचा प्रयत्न अपयशी ठरल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 

हरियानातील काँग्रेसच्या नव्या समन्वय समितीची पहिली बैठक दिल्लीत मंगळवारी झाली. त्या बैठकीमध्ये अनेक वरिष्ठ नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुडा हे या समितीचे अध्यक्ष आहेत. 

हरियानातील कुरुक्षेत्र, सिरसा, हिसार, कर्नाल, सोनिपत, रोहतक, भिवानी-महेंद्रगड, अंबाला, गुडगाव आणि फरिदाबाद या दहा लोकसभा मतदारसंघांत 12 मे रोजी मतदान होणार आहे. हरियाना काँग्रेसचे अध्यक्ष अशोक तन्वर यांना सिरसामधून लोकसभा निवडणूक लढवायची आहे; तर हुडा यांना विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्याची इच्छा आहे. हरियानात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. हुडा यांचा मुलगा दीपेंद्र हुडा रोहतकमधून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT