Loksabha 2019

Loksabha 2019 : 'सुजय विखे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करणार होते प्रवेश'

सकाळवृत्तसेवा

श्रीगोंदे : "डॉ. सुजय विखे-पाटील यांना "राष्ट्रवादी'ची उमेदवारी निश्‍चित झाली होती; मात्र, भाजप 'जिंकणारा पक्ष असल्याने तेथे जाऊ नका,' हा सल्ला आपणच विखे यांना दिला. उमेदवारी देऊन डोक्‍यावरून उचलून टाकण्याची "राष्ट्रवादी'ची चाल आपल्या लक्षात आल्याने विखेंना थांबविल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी आज केला.

डॉ. विखे यांच्या प्रचाराची नियोजन बैठक आज शहरातील "माऊली' या पाचपुतेंच्या निवासस्थानी झाली. कॉंग्रेसचे नेते अण्णा शेलार, "राष्ट्रवादी'चे नेते प्रा. तुकाराम दरेकर, दत्तात्रेय पानसरे, भगवानराव पाचपुते, बाळासाहेब गिरमकर, विठ्ठलराव काकडे, भाऊसाहेब गोरे, विक्रमसिंह पाचपुते, बाळासाहेब महाडीक, बाळासाहेब नाहाटा, अशोक खेंडके, सुभाष डांगे, सदाशिव पाचपुते, मिलिंद दरेकर, लक्ष्मण नलगे, माणिकराव पाचपुते, अनिल पाचपुते, ज्ञानदेव हिरवे आदी या वेळी उपस्थित होते. 

पाचपुते म्हणाले, "शरद पवार हे पंतप्रधान व्हावेत, हे मागे जसे वाटत होते, तसे आजही वाटते; मात्र साहेब अजूनही 1991च्या निवडणुकीतच गुंतल्याने, ते नव्हे तर पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील. "राष्ट्रवादी'चे नेते दिलीप वळसे पाटील यांनी त्यांची उमेदवारी डॉ. विखे यांना दिल्याचे आपणाला सांगितल्यावर आपण सुजय यांना सावध केले. कधी अनुराधा नागवडे, तर कधी प्रशांत गडाख, अशी नावे चर्चेत आणून डॉ. सुजय यांना डोक्‍यावरून टाकण्याची चाल "राष्ट्रवादी' खेळत असल्याचे सांगत, त्यांना जिंकायचे असेल तर भाजप हाच पर्याय असल्याचा सल्ला दिला. तो त्यांनी मानला.''

ज्यांच्यासाठी आपण खूप पळालो, त्यांनी किंमत केली नाही; मात्र, ज्यांच्यासाठी काहीच गेले नाही, त्या भाजपने आपल्याला सन्मान दिल्याचे पाचपुते यांनी नमूद केले. 

दक्षिणेतून कॉंग्रेस हद्दपार : शेलार 

अण्णा शेलार म्हणाले, "माझ्यावर अनेक जण शंका घेत आहेत; मात्र निष्ठावंत ही माझी ख्याती आहे. काळजी करू नका. आज जेथे आहे, तेथेच विधानसभेलाही राहीन. "राष्ट्रवादी'कडून सूडाचे राजकारण होत असेल, तर आम्हाला विचार करावा लागेल. नेत्यांचे राजकारण वाढविण्यासाठी एक पाऊल मागे येण्याची तयारी ठेवली आहे. दक्षिणेतील काँग्रेस संपली असून, केवळ प्रचारप्रमुख राजेंद्र नागवडे हे एकटेच पक्षात आहेत. तेच नेते आणि तेच कार्यकर्ते आहेत.'' 

'शेलार, एकाच ठिकाणी राहा'

पाचपुते यांनी पानसरे यांच्याकडे पाहत, "तुमच्याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. काही वेगळे करू नका, नाही तर अडचण होईल,' असे म्हटल्यावर टाळ्या पडल्या. शेलार भाषण करीत असताना नवा-जुना वाद उफाळला. पाचपुते निष्ठावंत गणपतराव काकडे व विलास भोसले यांनी शेलार यांना, "तुमच्या या वागण्याने सामान्य कार्यकर्ते आयुष्यातून उठले असून, ही नाटकं बंद करा आणि एकाच ठिकाणी राहा,' असा सल्ला दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Labour Day : कामगार दिन! प्रत्येकाला माहिती असायला हवे असे भारतातील 11 कायदे

Satara Lok Sabha : शरद पवारच माझे मुख्य प्रचारक; असं का म्हणाले खासदार उदयनराजे?

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT