Loksabha 2019

Loksabha 2019 : राज्याच्या रणभूमीवर युद्धविराम; अखेरच्या टप्प्यातील प्रचार थंडावला

सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील सतरा मतदारसंघांसाठीचा जनादेश सोमवारी (ता.29) रोजी मतपेटीत बंद होणार आहे. या शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचार करीत घाम गाळला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदी दिग्गजांनी शनिवारीही सभा, रोड शो करीत प्रचाराची राळ उडवून दिली. 

हा शेवटच्या टप्प्यात शिवसेना-भाजप युतीसमोर मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागा राखण्याचे मोठे आव्हान आहे. सलग सुट्या आल्यामुळे मतदानाचा टक्‍का वाढण्यासाठीही सर्वच राजकीय पक्षांची दमछाक होण्याची चिन्हे आहेत.

शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस या चार पक्षांच्या अनेक दिग्ग्जांचे भवितव्य आजमावणारा हा टप्पा आहे. 
देशात यंदाची सार्वत्रिक निवडणूक एकूण सात टप्प्यांत होणार आहे. राज्यात तीन टप्प्यांतील मतदान झाले असून, चौथा टप्प्याचे मतदान सोमवारी होणार आहे. मुंबई, ठाणे या ठिकाणच्या मतदारसंघांचा यात समावेश आहे. 

सुट्यांचे आव्हान 

चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानादरम्यान सलग सुट्या आल्या आहेत. चौथा शनिवार, रविवार आणि मतदानाच्या दिवशी खासगी आस्थापनांनीदेखील सुटी देण्यात आली आहे. यामुळे सलग तीन दिवस सुटी आली आहे. यामुळे मुंबईकर पर्यटनासाठी घराबाहेर पडण्याची शक्‍यता आहे. परिणामी, मतदान कमी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. यामुळे मतदानाचा टक्‍का वाढविण्याचे मोठे आव्हान राजकीय पक्षांपुढे असेल. 

येथे मतदान 

शिर्डी, उत्तर मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई, वायव्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नंदुरबार, धुळे, नाशिक, दिंडोरी, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, शिरूर व मावळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : जळगाव-पाचोरा रोडवर भीषण अपघातात; ३ शाळकरी मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT