corona
corona  sakal
महाराष्ट्र

राज्यात १४८ रुग्ण; १८ जिल्ह्यात नाही कोरोना! ७० लाख ज्येष्ठांनी घेतला नाही बुस्टर डोस

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील ६० वर्षांवरील तब्बल ७१ लाख ज्येष्ठांसह (४०.०९ लाख को-मॉर्बिड रुग्ण) १८ ते ५९ वयोगटातील ८१ टक्के व्यक्तींनी संरक्षित (बुस्टर) डोस घेतलेलाच नाही. परंतु, चीन, ब्राझिल, अमेरिका, जपानमध्ये कोरोना वाढल्याने केंद्र सरकारने खबरदारीच्या सूचना करीत लसीकरणावर भर देण्याचे आदेश दिले. दररोज दोन हजार व्यक्ती लस टोचण्याचे प्रमाण आता दहा हजारांहून अधिक झाले आहे. पण, राज्यात लसीचे १७ लाख डोस शिल्लक आहेत.

राज्यात ८ मार्च २०२० रोजी कोरोनाने पाऊल ठेवला. अडीच वर्षांहून अधिक काळ लोटला, तरीपण अजूनपर्यंत कोरोना हद्दपार झालेला नाही. अजूनही राज्याच्या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबई, पुण्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोनाने अनेक चिमुकल्यांचे आई-वडिल, निराधारांच्या आधाराची काठी, नवविवाहितेचा पती हिरावून नेला. आतापर्यंत राज्यातील ८१ लाख ३६ हजार ५११ व्यक्तींना कोरानाची बाधा झाली असून त्यातील तब्बल एक लाख ४८ हजार ४१५ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोना प्रतिबंधित लसीकरणामुळे मृत्यू थांबले, रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने रुग्ण देखील कमी झाले आणि बाधितांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. तरीपण, परदेशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला असून तेथे बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टेस्ट, ट्रॅक, ट्रिटमेंट, लसीकरण व कोरोना अनुरूप वर्तन या पाच बाबींवर लक्ष देण्याच्या सूचना राज्यांना केल्या आहेत. राज्यात सध्या १४८ सक्रिय रुग्ण आहेत.

धोका नाही, पण खबरदारी हवी

कोरोनाचा बीएफ-७ हा नवा व्हेरिएंट पदेशात आला असून त्याचे रुग्ण वाढत आहेत. आपल्याकडे यापूर्वी बीएफ-५ चे काही रुग्ण आढळले होते. कोरोनाचा धोका सध्या नाही, तरीपण प्रत्येकांनी स्वत:च्या संरक्षणासाठी खबरदारी म्हणून प्रतिबंधित लस टोचून घ्यायला हवी.

- डॉ. दिलीप म्हैसकर, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन

सोलापूरसह १८ जिल्हे कोरोनामुक्त

परदेशात कोरोना वाढतोय, पण महाराष्ट्रातील १८ जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्या सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नंदुरबार, धुळे, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. आपल्याकडे कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची भीती नाही, पण संरक्षणासाठी १८ वर्षांवरील सर्वांनीच प्रतिबंधित लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT