महाराष्ट्र

राज्यात १८० तालुके  दुष्काळसदृश

सकाळवृत्तसेवा

मुंबई - २०१८ च्या खरीप हंगामात दुष्काळी परिस्थितीच्या निकषाचे ट्रिगर २ लागू झालेल्या राज्यातील १८० तालुक्‍यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे आज राज्य सरकारने जाहीर केले. दुष्काळसदृश परिस्थितीवर उपाययोजना म्हणून या तालुक्‍यांमध्ये विविध सवलती लागू करण्यात आल्या असून, संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना या उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

२०१८ च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील सर्व तालुक्‍यांचे महा मदत संगणक प्रणालीद्वारे दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनानुसार राज्यातील २०१ तालुक्‍यांमध्ये ट्रिगर १ लागू झाले होते. या तालुक्‍यांचे प्रभावदर्शक निर्देशांकांचे मूल्यांकन करून ट्रिगर २ मध्ये समाविष्ट झालेल्या १८० तालुके आज जाहीर करण्यात करण्यात आले. या तालुक्‍यांमधील रॅंडम पद्धतीने १० टक्के गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल पाठविण्याच्या सूचना सर्व विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की यंदा राज्यात सरासरीच्या ७७ टक्के पाऊस पडल्याने दुष्काळी   परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे राज्य सरकारने ट्रिगर वन व ट्रिगर टू प्रमाणे १८० तालुके हे दुष्काळसदृश घोषित केले आहेत. या तालुक्‍यांमधील शेतकरी, विद्यार्थी आदींसाठी आठ विविध प्रकारच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. याचबरोबर राज्यातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणीचे काम जवळपास पूर्ण करण्यात आले आहे. त्या आधारावर पीक परिस्थितीचे आकलन समोर येत आहे. यानंतर लवकरच केंद्र शासनाचे पथक येऊन राज्यातील परिस्थितीची पाहणी करणार आहे.

राज्यात परिस्थिती गंभीर असून दुष्काळसदृश ऐवजी दुष्काळ जाहीर करा
- शरद पवार,  अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

यंदा झालेल्या कमी पावसामुळे राज्याच्या अनेक भागांत भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. तरीही सरकार राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे, असे सांगून जनतेची फसवणूक करत आहे. 
- अशोक चव्हाण,  प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काय ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT