महाराष्ट्र

बायोमेट्रिक प्रणालीमुळे चार हजार कोटींची बचत 

तात्या लांडगे

सोलापूर : धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता यावी, या उद्देशाने शासनाने सर्व रेशन दुकानांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित केली. त्यामुळे मागील दीड ते दोन वर्षांत तब्बल चार हजार दोनशे कोटी रुपयांची बचत झाली आहे. त्यानंतर आता डिसेंबरपासून धान्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविली जाणार आहे. त्यामुळे धान्य वितरण प्रणालीत आणखी पारदर्शकता येणार आहे. 

धान्य वाहतूक करणारी वाहने गोदामांमधून धान्य घेऊन निघाल्यानंतर कुठे थांबतात, कोणत्या मार्गाने जातात याची संपूर्ण माहिती जीपीएस यंत्रणेमुळे समजणार आहे. त्यामुळे वाहतूक खर्चात आणखी बचत होणार आहे. मागील दोन वर्षांत धान्याच्या वाहतुकीतून 65 ते 70 कोटी रुपयांची बचत झाली आहे. आता धान्याच्या पोत्यात माल कमी होणार नाही, याचीही काटेकोरपणे दक्षता घेतली जात आहे. 

रेशन दुकानांमधून मिळणार भुसार, भाजीपाला 
राज्यातील सर्व रेशन दुकानांमधून भुसार, तसेच भाजीपाला उपलब्ध करून देण्याचे नियोजन सरकार पातळीवर सुरू आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दरही मिळेल आणि हक्‍काची बाजारपेठही उपलब्ध होईल. भाड्याच्या गोदामांमुळे होणाऱ्या कोट्यवधींच्या खर्चात बचत व्हावी, यासाठी "नाबार्ड'च्या सहकार्यातून राज्यभरात 150 गोदामे बांधण्याचेही नियोजन राज्य सरकारने केले आहे. 

आकडे बोलतात... 
बायोमेट्रिकची स्थिती 

स्वस्त धान्य दुकाने - 52,969 
शिधापत्रिकाधारक - 1.27 कोटी 

स्वस्त धान्य दुकानांसाठी लागणाऱ्या धान्याची गरज, प्रत्यक्षात धान्य घेणाऱ्या रेशन कार्डधारकांची संख्या बायोमेट्रिक प्रणालीमुळे निश्‍चित झाली. त्यामुळे धान्याचा काळा बाजार नियंत्रणात आला. सोलापूर शहर-जिल्ह्यातील 87 टक्‍के रेशन कार्डधारकांना बायोमेट्रिक प्रणालीद्वारे धान्य वितरण केले जाते. उर्वरित रेशन कार्डधारकांची जोडणी डिसेंबरपर्यंत केली जाईल. 
- श्रीमंत पाटोळे, अन्नधान्य वितरण अधिकारी 


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Result: भाजपची धाकधूक वाढली; एक्झिट पोल फेल तर राजकीय विश्लेषकांचे अंदाज गडबडले

Lok Sabha Election Result: काँग्रेस नेतृत्त्वाची नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंशी चर्चा सुरु? दिल्लीत हालचालींना वेग

Amit Shah Lok Sabha: घरच्या मैदानात गृहमंत्र्यांचा विजयी हुंकार! अमित शहांना ३ लाखांपेक्षाही मोठी आघाडी

India Lok Sabha Election Results Live : '400 पार'ला लागलं ग्रहण! भाजपाचे 10 दिग्गज पिछाडीवर, ज्यामध्ये 7 मंत्री

Maharashtra Lok Sabha Election Results Live : अकोल्यात काँग्रेस-भाजपात काट्याची टक्कर, डॉ. अभय पाटील दहाव्या फेरी अखेर 12894 मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT