bank
bank 
महाराष्ट्र

बँक ऑफ महाराष्ट्रच्या 51 शाखा होणार बंद

सकाळवृत्तसेवा

मुंबई : देशात सुमारे 1900 शाखा असलेली व महाराष्ट्रात सर्वाधिक शाखा असलेली राष्ट्रीयकृत बँक 'बँक ऑफ महाराष्ट्र' आपल्या 51 शाखा बंद करत आहे. महाराष्ट्रातील एकूण 35 शाखा बंद होणार असून त्या शाखांमधील व्यवहार इतर शाखांमध्ये सुरळीतपणे होतील. बँक ऑफ महाराष्ट्र ठाण्यातील 7, मुंबईतील 6 आणि पुण्यातील 5 शाखा बंद करुन तेथिल कारभार इतर शाखांमध्ये विलीन करण्यात येणार आहे.

9600 कोटींच्या बुडीत कर्जामुळे 1200 कोटींचा तोटा बँक सध्या सहन करत आहे. हा तोटा भरून निघावा यासाठी बँकेने खर्चात कपात करण्यास सुरवात केली आहे. तसेच बँक ऑफ महाराष्ट्रने आर्थिक फायदा होत नसल्याचे कारण देत 51 शाखांचे विलीनीकरण इतर शाखांमध्ये केले आहे. ग्राहकांना बंद झालेल्या शाखेचे चेकबुक, एमआयसीआर कोड हे इतर शाखांमधून नव्याने घ्यावे लागतील. तसेच बंद होणार असलेल्या शाखांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली इतर शाखांमध्ये केली जाईल. 

महाराष्ट्रातील या शाखा होणार बंद :
- बँक ऑफ महाराष्ट्र, मुंबई, कॉटन
- बँक ऑफ महाराष्ट्र, सोलापूर, सोलापूर शिवशाही
- बँक ऑफ महाराष्ट्र, मुंबई, सिनिअर सिटीझन
- बँक ऑफ महाराष्ट्र, कोल्हापूर, कोल्हापूर खासबाग
- बँक ऑफ महाराष्ट्र, अमरावती, राजपेठ अमरावती
- बँक ऑफ महाराष्ट्र, मुंबई, वांद्रे पश्चिम
- बँक ऑफ महाराष्ट्र, ठाणे, अलयाली इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स
- बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे पूर्व, नेरे
- बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे पूर्व, विनझार
- बँक ऑफ महाराष्ट्र, मुंबई, डॉ. अॅनी बेझंट रोड ब्रँच
- बँक ऑफ महाराष्ट्र, जळगाव, गणपतीनगर
- बँक ऑफ महाराष्ट्र, लातूर, पीपल कॉलेज कॅम्पस बीआर. नांदेड
- बँक ऑफ महाराष्ट्र, ठाणे, एपीएमसी वाशी
- बँक ऑफ महाराष्ट्र, नागपूर, नागपूर यशवंत
- बँक ऑफ महाराष्ट्र, लातूर, योगेश्वरी ब्रँच
- बँक ऑफ महाराष्ट्र, नाशिक, हल टाऊनशिप, ओझर
- बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे सिटी, पेन्शन पेमेंट
- बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे सिटी, ससून रोड पुणे
- बँक ऑफ महाराष्ट्र, मुंबई, कॉर्पोरेट फायनान्स
- बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे पूर्व, एसएचजी पुणे
- बँक ऑफ महाराष्ट्र, सातारा, एसएचजी सातारा
- बँक ऑफ महाराष्ट्र, नागपूर, मिड कॉर्पोरेट ब्रँच नागपूर
- बँक ऑफ महाराष्ट्र, सातारा, मिड कॉर्पोरेट ब्रँच सातारा
- बँक ऑफ महाराष्ट्र, नाशिक, मिड कॉर्पोरेट ब्रँच नाशिक
- बँक ऑफ महाराष्ट्र, ठाणे, वसई पश्चिम
- बँक ऑफ महाराष्ट्र, जळगाव, दत्ता मंदिर चौक, धुळे
- बँक ऑफ महाराष्ट्र, ठाणे, नालासोपारा पूर्व
- बँक ऑफ महाराष्ट्र, ठाणे, विरार पूर्व
- बँक ऑफ महाराष्ट्र, अमरावती, अर्जुन नगर
- बँक ऑफ महाराष्ट्र, ठाणे, बोईसर
- बँक ऑफ महाराष्ट्र, मुंबई, एसएचजी मुंबई
- बँक ऑफ महाराष्ट्र, ठाणे, एसएचजी ठाणे
- बँक ऑफ महाराष्ट्र, नाशिक, एसएचजी नाशिक
- बँक ऑफ महाराष्ट्र, औरंगाबाद, एसएचजी ब्रँच
- बँक ऑफ महाराष्ट्र, औरंगाबाद, एसएचजी जालना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT