Aditya Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Aditya Thackeray: पक्ष गेलं, चिन्ह गेलं आता दोस्त-दोस्त ना रहा... ठाकरेंचे सावध पाऊल, घेतला 'हा' निर्णय

Sandip Kapde

ठाकरे गटाचा उद्या मुंबईत शिंदे-फडणवीस सरकारविरोधात मोठा मोर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट देखील आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का देणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत जवळचा असलेला एक नेता शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहे. येत्या १ जुलै रोजी त्यांचा प्रवेश होत आहे. मागच्या वर्षी त्यांच्या घरावर सीबीआयचा छापा पडला होता, तेव्हापासून ते सक्रीय नव्हते.

आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे राहुल कनल हे येत्या एक जुलै रोजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. गेल्या वर्षी राहुल कनल यांच्या घरावर सीबीआयचा छापा पडला होता. तेव्हापासून राहुल कनाल हे शिवसेनेत फारसे सक्रिय नव्हते. यामुळे ठाकरे गटाने सावध पाऊल उचलले आहे.

राहुल कनाल यांच्या विभागातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती देण्यात आली आहे. वांद्रे पश्चिममधील युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती देण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून हे आदेश काढण्यात आले. राहुल कनाल हे उद्याच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.

मागील एक वर्षाच्या काळात राहुल कनल शिवसेना भवन किंवा 'मातोश्री'वर देखील ते फिरकले नाहीत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी युवा सेनेच्या कोअर कमिटीच्या व्हाट्सअप ग्रुप मधून देखील एक्झिट केला होता. तेव्हापासूनच ते ठाकरेंची साथ सोडून इतर कोणत्यातरी पक्षात जाणार अशी चर्चा रंगली होती.

मात्र आता त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असून येत्या एक जुलै रोजी ते आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT