Abhijit-Panse-Sanjay-Raut
Abhijit-Panse-Sanjay-Raut 
महाराष्ट्र

'ठाकरे' चित्रपटावरून पानसे-राऊत वाद

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - 'ठाकरे' या चित्रपटाचा "प्रीमियर' बुधवारी सायंकाळी वरळी येथे झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि मनसेचे नेते अभिजित पानसे येण्यापूर्वीच खेळ सुरू झाला. बसण्यासाठी व्यवस्था न केल्यामुळे नाराज झालेले पानसे चित्रपट न पाहताच निघून गेले. त्यावरून या चित्रपटाचे निर्माते शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि पानसे यांच्यात वाद झाला. राऊत यांनी केलेल्या ट्‌विटमुळे वाद चिघळला; नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवल्यावर राऊत यांनी हे ट्‌विट काढून टाकले.

'ठाकरे' चित्रपटाच्या "प्रीमियर'वेळी झालेल्या मानापमान नाट्यानंतर राऊत यांनी 'लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला, की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे,''

असे खोचक ट्‌विट करीत पानसे यांना टोला लगावला होता. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पानसे यांना पाठिंबा देत, 'मा. बाळासाहेब सामान्य शिवसैनिकालासुद्धा प्रेमाने वागवायचे; त्याचा अपमान नाही करायचे. हाच ठाकरे चित्रपटाचा संदेश आहे. तो या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्यांनाही कळला नाही,'' असे ट्‌विट केले. त्यानंतर मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक नेटकऱ्यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे राऊत यांनी माघार घेत वादग्रस्त ट्‌विट काढून टाकले.

शिवसेनेवर हल्लाबोल
अभिजित पानसे यांचा झालेला अवमान मनसे कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला. "अभिजित, हे असं वागणं त्यांची संस्कृती आहे. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षक तुझ्या सोबत आहेत,' असे संदेश मनसे पदाधिकाऱ्यांनी समाजमाध्यमांवर टाकले. "आय सपोर्ट अभिजित पानसे' असा "हॅशटॅग' वापरत नेटकऱ्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT