zp schools
zp schools sakal
महाराष्ट्र

शिक्षक भरतीसाठी २६ झेडपीच्या ‘पवित्र’वर जाहिराती! ‘इंग्रजी’साठी २५ टक्के जागा; ‘कन्नड’ची बिंदुनामावली अपूर्णच; २८ फेब्रुवारीपर्यंत भरती प्रक्रिया संपणार

तात्या लांडगे

सोलापूर : सात वर्षांनंतर राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये ३२ हजार शिक्षकांची भरती होत आहे. आतापर्यंत २६ जिल्हा परिषदांसह काही महापालिकांच्या जाहिराती ‘पवित्र’ पोर्टलवर अपलोड झाल्या आहेत. मात्र, कन्नड माध्यमांची बिंदुनामावली अजूनपर्यंत अपूर्ण असल्याने ‘कन्नड’मधून डीएड झालेल्या भावी शिक्षकांची चिंता वाढली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेने मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांमधील पदांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम करून घेतली आहे. आता आंतरजिल्हा बदलीतून येणाऱ्या शिक्षकांची संख्या गृहीत धरून सोलापूर जिल्हा परिषदेकडून दोन दिवसांत रिक्त पदांची जाहिरात ‘पवित्र’वर अपलोड होणार आहे. पण, कन्नड माध्यमांच्या शाळांमधील रिक्त शिक्षकांची बिंदुनामावली अजूनपर्यंत अंतिम झालेली नाही. त्यामुळे आमच्या माध्यमांची शिक्षक भरती कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करीत काही भावी शिक्षकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात धाव घेतली होती.

अशी स्थिती अनेक जिल्हा परिषदांमध्ये असल्याची वस्तुस्थिती आहे. पण, ‘कन्नड’ची बिंदुनामावली पुण्याच्या मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेतली जात आहे. काही दिवसांत ती अंतिम होईल आणि त्यानंतर त्या माध्यमांचीही शिक्षक भरती होईल, असे शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. मागासवर्गीय कक्षाला पाठविलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या बिंदुनामावलीत कन्नड शिक्षकांची ३२ पदे रिक्त आहेत. दरम्यान, सध्या एकूण रिक्तपदांपैकी ७० टक्के पदांचीच भरती होणार आहे.

‘या’ शाळांवर इंग्रजी विषय शिक्षक

पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये २० टक्के इंग्रजी माध्यमांचे शिक्षक घेण्याचा शासन निर्णय होता. तो रद्द झाला असून १३ ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार आता ज्या मराठी शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग आहेत, अशाठिकाणी सहावी ते आठवीसाठी चारपैकी एक शिक्षक इंग्रजीचा असावा आणि केंद्र शाळांअंतर्गत जेवढ्या शाळा आहेत, त्याठिकाणी एक शिक्षक इंग्रजीचा (साधन व्यक्ती म्हणून) शिक्षक नियुक्त केला जाणार आहे. इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा कल वाढल्याने मराठी शाळांमधील पटसंख्या कमी होत असल्याने शासनाने असा निर्णय घेतला आहे. त्यानुसार साधारणत: एकूण रिक्तपदांपैकी २५ टक्के शिक्षक इंग्रजीचे भरती होणार आहेत. संबंधित जिल्हा परिषदांच्या मागणीनुसार ती पदे भरली जातील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

फेब्रुवारीअखेर शिक्षक भरती पूर्ण करण्याचे नियोजन

सध्या २३ जिल्हा परिषदांकडून पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या जाहिराती अपलोड केल्या असून सोलापूरसह इतर दोन जिल्हा परिषदांच्या जाहिराती १५ जानेवारीपर्यंत अपलोड होतील. त्यानंतर साधारत: २२ जानेवारीपासून नोंदणीकृत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत. त्यासाठी आठ ते दहा दिवसांची मुदत दिली जाणार आहे. त्यानंतर छाननीसाठी तीन आठवड्यांचा अवधी दिला जाणार आहे आणि फेब्रुवारीअखेर मेरिट यादी प्रसिद्ध करून शिक्षक भरतीचा शेवट होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कारखानदारांसह सरकारला हादरे देणाऱ्या राजू शेट्टींचं नेमकं चुकलं कुठं? पराभवानंतर शेट्टींवर आत्मचिंतनाची आली वेळ!

Women MP : विदर्भातून ७२ वर्षांत झाल्या केवळ १४ महिला खासदार; भावना गवळी पाचवेळा विजयी

T20 World Cup: अमेरिकेनं पाकिस्तानचा केला गेम... सोशल मीडियावर रंगली चर्चा, मीम्सचाही पडला पाऊस

Google Microsoft Layoffs: असं काय झालं की गुगल आणि मायक्रोसॉफ्टच्या हजारो कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या, समोर आलंय धक्कादायक कारण

Saif Ali Khan : अमृता सिंहने सैफला सिनेमादरम्यान दिली झोपेची गोळी ; 'हे' होतं कारण

SCROLL FOR NEXT