Saif Ali Khan : अमृता सिंहने सैफला सिनेमादरम्यान दिली झोपेची गोळी ; 'हे' होतं कारण

Amruta Singh give sleeping pills to Saif Ali Khan : अभिनेत्री अमृता सिंहने सैफ अली खानला 'हम साथ साथ है' सिनेमादरम्यान झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या.
Saif Ali Khan And Amrita Singh
Saif Ali Khan And Amrita SinghEsakal

Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खान त्याच्या उत्तम अभिनयाबरोबरच त्याच्या स्टायलिश अंदाजामुळेही प्रसिद्ध आहे. आजवर सैफने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्याच्या उत्तम अभिनयाने त्याने सगळ्यांची मनं जिंकली आहेत.

त्याचा एक गाजलेला सिनेमा म्हणजे नव्वदच्या दशकात आलेला 'हम साथ साथ है'. एकत्र कुटूंब पद्धतीवर भाष्य करणारा हा सिनेमा खूप गाजला होता. या सिनेमाबाबतचा एक किस्सा सध्या सोशल मीडियावर गाजतोय.

सैफला दिली झोपेची गोळी

एका मुलाखतीत 'हम साथ साथ है' या सिनेमाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी खुलासा केला कि," ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या वेळी सैफच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार सुरु होते. त्यामुळे तो नेहमी चिंतेत असायचा. चित्रपटातील ‘सुनो जी दुल्हन’ या गाण्याचे शूटिंग सुरू असताना तो अनेक रिटेक घेत होता. याबाबत जेव्हा मी सैफची पहिली पत्नी अमृताशी बोललो तेव्हा मला कळलं की, सैफ रात्रभर जागा राहायचा आणि चित्रपटातील त्याची व्यक्तिरेखा चांगल्या पद्धतीने कशी वठवता येईल याचा विचार करत बसायचा. जेव्हा मला ही गोष्ट कळली तेव्हा मी अमृताला सैफला झोपेच्या गोळ्या देण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अमृताने सैफच्याच नकळत त्याला झोपची गोळी दिली. यानंतर जेव्हा सैफ दुसऱ्या दिवशी सेटवर आला तेव्हा त्याने एकाच टेकमध्ये एकदम चांगला शॉट दिला. त्यावेळी सेटवर उपस्थित सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता."

Saif Ali Khan And Amrita Singh
Salman Khan: सलमानसोबत लग्नाचा हट्ट, 24 वर्षांची मुलगी पोहोचली पनवेलमधील फार्म हाऊसवर, पोलिसांनी थेट...

'ही' होती 'हम साथ साथ है' ची कास्ट आणि कथा

'हम साथ साथ है' हा सिनेमा १९९९ मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमात रीमा लागू, आलोक नाथ, सलमान खान, सोनाली बेंद्रे, मोहनीश बहल, तब्बू, सैफ अली खान, करिष्मा कपूर, नीलम, सदाशिव अमरापूरकर, महेश ठाकूर, शक्ती कपूर, सतीश शाह यांची मुख्य भूमिका होती.

एका कुटूंबातील तीन भाऊ, एकत्र कुटूंब पद्धतीवर असलेला विश्वास नंतर घरात पडलेली फूट तरीही भावांचं टिकून राहिलेलं प्रेम यावर हा सिनेमा बेतला होता.

Saif Ali Khan And Amrita Singh
Saif Ali Khan: "आम्ही मुलांना जन्म देतो त्यांना स्टारकिड तुम्ही बनवता"; सैफ अली खान थेटच बोलला!

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com