Abdul Sattar in Baramati News
Abdul Sattar in Baramati News Sakal
महाराष्ट्र

Abdul Sattar : सुप्रिया सुळेंबद्दल अपशब्द बोलणारे सत्तार बारामतीत अन्...

दत्ता लवांडे

Baramati News: बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राद्वारे आयोजित कृषिक २०२३ या कृषी प्रदर्शनाला आजपासून सुरूवात झाली आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार, विरोधीपक्षनेते अजित पवार, राजेंद्र पवार, सौ.सुनंदा पवार यांच्या उपस्थितीमध्ये झाले. सिल्लोड महोत्सवानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी बारामती येथील कृषीक प्रदर्शनाला हजेरी लावल्यामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. (Abdul Sattar in News)

हेही वाचा - शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळाला होता.

त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याचीसुद्धा मागणी करण्यात आली होती. त्यामुळे सुप्रिया सुळे, पवार घराणे आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झाला होता. त्यानंतर आता खुद्द सत्तार हे कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने बारामतीमध्ये दाखल झाले आहेत.

राजकीय वैर संपवण्याच्या हिशोबाने सत्तार बारामतीत?

राजकीय वैर संपवण्याच्या हिशोबाने सत्तार हे बारामती येथे आले आहेत अशा चर्चा आता सुरू झाल्या असून पवार घराणे त्यांना मानसन्मान देऊन राजकीय प्रगल्भता दाखवणार का? याकडे लक्ष लागलेले आहे.

कारण सुप्रिया सुळे या प्रगल्भ राजकारण करतात, त्या आरोप प्रत्यारोपामध्ये जास्त गुंतत नाहीत असं सारखं बोललं जातं. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि पवार घराण्यांकडून सत्तारांना बारामतीमध्ये कशा प्रकारे हाताळलं जातंय याकडे लक्ष लागलेलं आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

"जे कोणी बारामतीमध्ये येतात त्यांचे स्वागतच आहे. कारण आमच्या वर 'अतिथी देवो भव' असे संस्कार झाले आहेत त्यामुळे जे येतील त्यांचे स्वागत" असं खासदार सुप्रिया सुळे म्हणल्या.

काय म्हणाले सत्तार?

बारामतीच्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे आदर्श धडे थेट शिवारात पहायला मिळतात. त्यामुळे बारामतीचे कृषिक कृषी प्रदर्शन असो अथवा भिमथडी असो त्यामध्ये वैशिष्ठपूर्ण काहीतरी असतेच.

शेती विकासाचे ज्ञान देशभर पसरविण्यासाठी बारामतीचे कृषिक प्रदर्शन उपयुक्त आहे. अर्थात या शेतकरी हिताच्या गोष्टी पाहण्यासाठी मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून बारामतीला आलो आहे. राजेंद्रदादा तुमचे कार्य उत्तम आहे अशा शब्दांत सत्तारांनी या प्रदर्शनाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT