Motivational Video: हातात तिरंगा, अंगावर नऊवारी साडी; 80 वर्षाच्या आजीची मॅरेथॉनमध्ये धाव

आजकालच्या तरूणांसाठी या आजी मोठं उदाहरण ठरल्या आहेत.
Motivational Video for youth
Motivational Video for youthSakal

मुंबई : मुंबई मध्ये १५ जानेवारी रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. टाटा ग्रुपने आयोजित केलेल्या या मॅरोथॉनमध्ये अनेक नागरिक सहभागी झाले होते. या निमित्ताने मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले होते. यावेळी अनेक नागरिकांच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचे दर्शन झाले.

हेही वाचा - शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

डोक्यावर भगवा फेटा, अंगावर नऊवारी साडी आणि पायात स्पोर्ट्स शूज अशा पेहरावातील मराठी महिलेचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

त्यानंतर आता एका ८० वर्षाच्या मराठी आजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या हातात तिरंगा घेऊन या मॅरेथॉनमध्ये धावताना दिसत आहेत.

दरम्यान, मी भारताची रहिवाशी असल्यामुळे मी तिरंगा घेऊन धावते अशी प्रतिक्रिया या आजीने व्यक्त केली आहे.

त्यांनी अंगावर नऊवारी साडी नेसून मराठी संस्कृतीचे दर्शन घडवलं आहे. वयाच्या ८० व्या वर्षीसुद्धा मॅरेथॉनमध्ये धावण्याची उर्मी पाहून आपल्याला या आजीकडून प्रेरणा मिळेल. तर आजकालच्या तरूणासाठी या आजी मोठं उदाहरण ठरल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com