Court Decision
Court Decision 
महाराष्ट्र

मागेल तेव्हा पोटगी!

सकाळवृत्तसेवा

मुंबई - सहमतीच्या घटस्फोटात पोटगी घेणार नाही, असे मान्य करूनही पत्नीने भविष्यात गरज भासल्यास पोटगी मागितली, तर पतीने पोटगी द्यायला हवी, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला. पत्नीला पोटगी देण्याचा कनिष्ठ न्यायालयाने निर्णय दिला होता. त्याला पतीने आव्हान दिल्यावर उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार देऊन अगोदरचा निकाल कायम ठेवला. 

सांगलीतील पती-पत्नीच्या कौटुंबिक वादाबाबत उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. पती-पत्नीने सहमतीने आठ वर्षांपूर्वी लोकअदालतीत घटस्फोट घेतला होता आणि त्याबाबतच्या अटी लेखी स्वरूपात दोघांनीही स्थानिक न्यायालयात मान्य केल्या होत्या. त्यानुसार सहमतीने घटस्फोट घेत असून पत्नी पतीकडून पोटगीची मागणी करणार नाही, असे नमूद करण्यात आले होते; मात्र घटस्फोट मंजूर झाल्यानंतर पत्नीने काही महिन्यांतच पोटगीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. हा अर्ज स्थानिक न्यायालयाने मंजूर करून पतीने पत्नीला पोटगी द्यावी, असे आदेश दिले होते. या निर्णयाला पतीने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले. पत्नीने सहमतीने घटस्फोट घेताना पोटगी मागणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे आता तिला पोटगी मागण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद पतीच्या वतीने करण्यात आला होता.

भविष्यात पत्नी धरू शकते आग्रह
कनिष्ठ न्यायालयाच्या निकालावर उच्च न्यायालयातील आव्हान याचिकेत पत्नीला पोटगी मागण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद पतीच्या वतीने करण्यात आला होता. त्यावर न्या. एम. एस. सोनक यांनी, पोटगी घेणार नाही, असे पत्नीने मान्य केले असले तरी भविष्यात तिला गरज वाटल्यास ती पोटगीसाठी आग्रह धरू शकते, असे निकालात स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT