gurudas baba
gurudas baba 
महाराष्ट्र

Amravati Gurudas Baba: गुरुदासबाबाला अखेर भोपाळमध्ये पकडलं! अत्याचारासह छेडाछेडीचे दोन गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : दोन महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यापासून फरार झालेला भोंदू गुरुदास बाबा याला स्थानिक गुन्हे शाखेनं मध्यप्रदेशच्या भोपाळ इथून पकडलं आहे. अमरावतीत कुऱ्हा ठाण्याच्या हद्दीत एका गावातील प्रशस्त जागेवर या कथीत बाबानं आश्रम थाटला होता. (amravati gurudas baba finally caught in Bhopal two cases of molestation with torture have been registered)

गुरुदास बाबा उर्फ सुनील जानराव कावलकर (वय ४७) असं या भोंदू बाबाचं नाव आहे. त्याच्याविरुद्ध २५ जानेवारी २०२४ रोजी कुऱ्हा ठाण्यात अत्याचार तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा पहिला तर, दुसरा विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. मध्यप्रदेश येथील एक महिला तिच्या कौटुंबिक समस्यांच्या निराकरणासाठी गुरुदास उर्फ सुनील यांच्या आश्रमामध्ये आली होती. (Latest Marathi News)

पिडीतेनं आपली समस्या या बाबाला सांगितल्यानंतर त्यानं समस्येचं निराकरण करण्यासाठी तिला सहा ते सात महिनं आश्रमामध्ये राहावं लागेल असं सांगितलं, यानंतरच तिची समस्या सुटेल असं तिला सांगितलं. त्यामुळं पीडित महिला सहा ते सात महिने आश्रमात राहिली. त्यानंतर तिच्या मनात तिच्याच पतीविरुद्ध अविश्वास दाखवून, या बाबानं तिला लग्नाचं आमिष दाखवून, अंगाऱ्यासारखी वस्तू खायला दिली. पीडित महिला बेशुद्ध झाल्यानंतर याबाबानं तिच्यावर अत्याचार केला, असा आरोप पिडीत महिलेनं तक्रारीत केला आहे. तर, दुसऱ्या एका महिलेनंही या बाबाविरुद्ध तक्रार दिली आहे. (Marathi Tajya Batmya)

दुसरी पीडित महिला पोटाचा आजार असल्यानं उपचारासाठी या बाबाच्या आश्रमात गेली होती. या बाबानं तिला चिलममधील अंगारासारखा पदार्थ खायला दिल्यानं तिला गुंगी आली त्यानंतर त्यानं तिच्यासोबत अश्लील चाळे केले. त्यामुळं याप्रकरणीही त्या बाबावर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला गुरुदास महाराज उर्फ सुनील जानराव कावलकर हा भोपाळ इथल्या एका लॉजवर असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली आणि अमरावतीत आणलं. (Latest Maharashtra News)

धोतरातील महाराज पॅन्ट शर्टवर

आश्रमात हा भोंदू बाबा धोतर परिधान करीत होता. परंतू गुन्हा दाखल होताच पसार झाल्यानंतर स्वत:ची ओळख लपविण्यासाठी त्यानं दाढी काढून डोक्यावरील केसही कापले. तसेच धोतराऐवज तो फुलपॅन्ट आणि शर्ट अशा वेशात वावरु लागला.

अनेक ठिकाणी भ्रमंती

फरार कालावधीत गुरुदास बाबानं उत्तरप्रदेश व मध्यप्रदेश या राज्यात मुक्काम केला. दाढी काढल्यानंतर अनेक तिर्थस्थळालाही भेटी दिल्याची कबुली त्यानं गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांपुढं दिली.

त्यानंतर या सुनील कावलकरला शुक्रवारी (ता. ९) तिवसा न्यायालयासमोर हजर केलं. अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक किरण वानखडे, उपनिरीक्षक सागर हटवार, मुलचंद भांबुरकर, अमोल देशमुख, सचिन मिश्रा, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, संजय प्रधान, सागर धापड, रितेश वानखडे, गुणवंत शिरसाट, चेतन गुल्हाने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: देशातील 'या' राज्यात होत आहे सर्वाधिक मतदान, वाचा दुपारी 1 पर्यंतची आकडेवारी

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT