Anil deshmukh
Anil deshmukh esakal
महाराष्ट्र

''परमवीर सिंहांना हाताशी धरुन विदर्भाच्या नेत्याने मला १४ महिने आतमध्ये टाकलं'' अनिल देशमुखांचा रोख कुणाकडे?

संतोष कानडे

मुंबईः राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी गुरुवारी पुन्हा एकदा अँटिलिया प्रकरणावर भाष्य केलं आहे. त्यांनी नाव न घेता विदर्भातील एका मोठ्या नेत्यावर आरोप केले.

पत्रकारांशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत आमच्या बाजूनेच निर्णय लागेल. निवडणूक आयोगाने दबावाखाली काम केलं तर मात्र वेगळा निर्णय लागू शकतो. माझ्याबाबतीत तसाच अन्याय झाला. मला १४ महिने जेलमध्ये राहावं लागलं.

काय म्हणाले अनिल देशमुख?

मी जेव्हा गृहमंत्री होतो त्यावेळेला परमवीर सिंह आयुक्त होते. मुकेश अंबानींच्या घरासमोरील गाडीत स्फोटकं ठेवली आणि त्यानंतर गाडीच्या मालकाची हत्या करण्यात आली. परमवीर सिंह आणि वाझे यांचा त्याच्यात हात होता. गृहमंत्री असल्यामुळे ती त्यांची बदली करुन त्यांना सस्पेंड केलं. तर वाझेला सरकारी नोकरीतून निलंबित केलं.

अनिल देशमुख पुढे म्हणाले, हे दोघे नाराज झाले होते. त्यानंतर विरोधी पक्षाचे नेते जे की आपल्या विदर्भाचे आहेत, त्यांनी परमवीर सिंह यांना हाताशी धरुन माझ्यावर आरोप करायला सुरुवात केली. हायकोर्टात केस गेल्यानंतर कोर्टाने त्यात तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. ऐकीव माहितीच्या आधारावर आरोप केल्याचं हायकोर्टात स्पष्ट झालं.

देशमुख म्हणाले, आरोप करणारे परमवीर सिंह यांना कोर्टाने अनेकदा बोलावलं होतं. सहा समन्स काढूनही ते हजर झाले नाहीत. शेवटी त्यांचं पकड वॉरंट काढलं. मग कुठे परमवीर सिंहांनी कोर्टात शपथपत्र देत माझ्याकडे पुरावे नाही आणि जे आरोप केले ते ऐकीव माहितीवर होते, असं म्हटलं. परंतु त्यामुळे १४ महिने आतमध्ये राहावं लागलं; अशी खंत अनिल देशमुख यांनी बोलून दाखवली.

अनिल देशमुख यांचा रोख देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण अँटिलिया प्रकरणात फडणवीस विरोधी पक्षनेते होते आणि त्यांनीच जोरदारपणे हे प्रकरण सभागृहात लावून धरलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT