anil parab
anil parab 
महाराष्ट्र

ईडीच्या नोटिशीनंतर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : सक्तवसुली संचालनालयानं अर्थात ईडीनं नोटीस पाठवल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब पहिल्यांदाच माध्यमासमोर आले, यावेळी त्यांनी आपल्याला ईडीनं नोटीस पाठवल्याचं सांगितलं. तसेच ही नोटीस नक्की कशासाठी पाठवली आहे? हे अद्याप माहिती नसून त्याला कायदेशीररित्या उत्तर पाठलं जाईल असं सांगितलं.

परब म्हणाले, "आज संध्याकाळी मला ईडीची नोटीस मिळालेली आहे. या नोटीशीमध्ये कुठल्याही प्रकरणाचा उल्लेख नाही. केवळ ३१ तारखेला सकाळी ११ वाजता आमच्या कार्यालयात आपण हजर व्हावं, असं त्याच्यात म्हटलेलं आहे. या व्यतिरिक्त त्यामध्ये विशेष कुठलाही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे कशाच्या संदर्भात ही नोटीस आहे, हे आत्ता मला सांगता येणार नाही."

"या नोटिशीमध्ये चौकशीसाठी असं म्हटलेलं आहे, बाकी काहीही उल्लेख केलेला नाही. त्यामुळं ही नोटीस कुठल्या कारणास्तव दिली आहे, हे कळलेलं नाही. परंतू साधारणतः आम्हाला अशी अपेक्षा होतीच की असं काहीतरी होईल. त्यामुळे या नोटीशीला आता कायदेशीर उत्तर किंवा सल्ला घेऊन आम्ही त्याचं उत्तर देऊ," असंही परब यांनी यावेळी स्पष्ट केलं.

संजय राऊत यांनी दिली नोटिशीची माहिती

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अनिल परब यांना ईडीनं नोटीस बजावल्याची माहिती ट्विट करुन दिली होती. संजय राऊत यांनी यावरुन भाजपवर टीकास्त्र डागलं. त्यांनी म्हटलं, "शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. Chronology कृपया समज लिजीये. पुढे त्यांनी म्हटलंय की, कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू. अनिल परब यांना आता येत्या मंगळवारी हजर राहण्याचे आदेश या नोटीशीमध्ये देण्यात आले आहेत."

अनिल परब का आहेत भाजपच्या रडारवर?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गेल्या मंगळवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. काही वेळातच त्यांची जामिनावर सुटकाही झाली. पण नारायण राणे यांच्या अटकेमध्ये राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमुळे राणे यांच्या अटकेमागे अनिल परब असल्याचे बोलले जात आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणजे परब यांना पाठवलेली आजची नोटीस असं बोललं जात आहे. याआधी आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांच्या अटकेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या अटकेमागे अनिल परब असल्याचा भाजपचा आरोप आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने राजकीय कुरघोडी करण्यासाठी ही नोटीस पाठवली असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणात आज सर्वात मोठी घडामोड! बाप-लेकाला कोर्टात हजर करणार, नव्याने गुन्हा दाखल

Pune Porsche Accident: अल्पवयीन आहे म्हणून काय झालं? उत्तराखंडमधील एकाला जामीन नाकारला, पुण्यात वेगळा न्याय कशामुळे

RR vs RCB : सामना न खेळता RCB आयपीएलमधून जाणार बाहेर? BCCIच्या 'या' नियमामुळे चाहते टेन्शनमध्ये

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; मिडकॅप निर्देशांक उच्चांकावर, कोणते शेअर्स वधारले?

Loksabha Election : अमित शहांच्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक;‘आप’ला मतदान करणारे पाकिस्तानी असल्याचा केला होता दावा

SCROLL FOR NEXT