appasaheb dharmadhikari
appasaheb dharmadhikari  sakal
महाराष्ट्र

राजकारण करु नका! दुर्दैवी घटनेनंतर Appasaheb Dharmadhikari यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः नवी मुंबईतल्या खारघर येथे काल राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना २०२२चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला लाखो श्री सेवकांची उपस्थिती होती. मात्र कडाक्याच्या उन्हाने अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यांना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र आतापर्यंत १३ श्री सेवकांचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रुग्णालयाला भेट दिली. मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये आणि आपत्तीग्रस्तांचे मोफत उपचार करण्याचे आश्वासन शिंदेंनी दिले.

त्यानंतर आज राज्यातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी रुग्णालयात जात श्री सेवकांच्या प्रकृतीची चौकशी केली. महाराष्ट्र शासनाने कार्यक्रम सायंकाळच्या वेळी ठेवला असता तर ही दुर्दैवी वेळ आलीच नसती, अशी प्रतिक्रिया देत राज्य शासनावर अनेकांनी ताशेरे ओढले.

दरम्यान, खुद्द आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, श्री सेवकांचा परिवार देशभर पसरला आहे. काल घडलेला प्रकार अतिशत दुर्दैवी आहे. त्याचं राजकारण करु नका. हे संकट माझ्या कुटुंबावर आलेलं संकट आहे. श्री सदस्यांची एकमेकांसोबत राहण्याची परंपरा आहे. माझे दुःख हे व्यक्त करण्यापलीकडचे आहे. आम्ही कायम आपद्ग्रस्तांसोबत आहोत, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Scratch Card Fraud: कार्ड स्क्रॅच केलं अन् गमावले 18 लाख रुपये, लिफाफ्याच्या जाळ्यात अडकली महिला; वाचा धक्कादायक प्रकरण

Allu Arjun: आमदार मित्राच्या घरी गेलेल्या अल्लू अर्जुनवर पोलिसांनी दाखल केला गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

IPL 2024 Playoff Scenarios : आता 4 पैकी फक्त 3 जागा शिल्लक! 'हे' दोन संघ जाणार कन्फर्म; शेवटची सीट कोणाच्या नशीबात?

Uddhav Thackeray Interview: शरद पवार अन् मी म्हणजे संताजी-धनाजी..., मोदींची औरंगजेबाशी तुलना करत ठाकरेंची टोलेबाजी

Mother's Day 2024 : आई आणि मुलांच्या शारिरीक अन् मानसिक विकासासाठी फायदेशीर योगासने, जाणून घ्या सरावाची योग्य पद्धत

SCROLL FOR NEXT