IPL 2024 Playoff Scenarios : आता 4 पैकी फक्त 3 जागा शिल्लक! 'हे' दोन संघ जाणार कन्फर्म; शेवटची सीट कोणाच्या नशीबात?

IPL 2024 Playoff Scenarios : आयपीएल 2024 मधील प्लेऑफची शर्यत खूपच रोमांचक झाली आहे. या हंगामात आतापर्यंत 60 सामने खेळले गेले आहेत, परंतु केवळ 1 संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला आहे.
IPL 2024 Team Photo
IPL 2024 Playoff Scenarios Team Photo News Marathisakal

IPL 2024 Playoff Scenarios : आयपीएल 2024 मधील प्लेऑफची शर्यत खूपच रोमांचक झाली आहे. या हंगामात आतापर्यंत 60 सामने खेळले गेले आहेत, परंतु केवळ 1 संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला आहे. कोलकाता नाईट रायडर्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. त्याच वेळी, आता तीन जागा शिल्लक आहेत. पण या तीन प्लेऑफच्या जागांसाठी अनेक संघ दावेदार आहेत. अशा परिस्थितीत कोणत्या संघाला प्लेऑफमध्ये जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे ते सांगूया.

IPL 2024 Team Photo
IPL 2024 : KKR विरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या संतापला, या खेळाडूंना धरले जबाबदार

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज आतापर्यंत प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. अशा स्थितीत राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे उर्वरित तीन स्थानांचे दावेदार आहेत.

मात्र, यावेळी राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आघाडीवर आहे. राजस्थान सध्या 16 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत, उर्वरित 3 पैकी एक सामना जिंकून ते प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित करेल.

IPL 2024 Team Photo
IPL 2024 : दिल्लीच्या कर्णधारवर बंदी, बंगळूरला संधी... RCB की DC आज कोणाचा खेळ खल्लास होणार?

सनरायझर्स हैदराबाद सध्या 14 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. त्याचबरोबर पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर असलेल्या CSK च्या अडचणी काहीशा वाढल्या आहेत. सीएसकेला आपले उर्वरित दोन सामने राजस्थान रॉयल्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळायचे आहेत. आणि 16 गुणांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना दोन्ही सामने जिंकावे लागतील. त्याचबरोबर एका पराभवानंतरही ते शर्यतीत कायम असले तरी इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागेल.

IPL 2024 Team Photo
IPL 2024 : दिल्लीच्या कर्णधारवर बंदी, बंगळूरला संधी... RCB की DC आज कोणाचा खेळ खल्लास होणार?

दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्सच्या संघांनाही प्रत्येकी 16 गुण गाठण्याची संधी आहे. मात्र दोन्ही संघांना एकमेकांविरुद्ध एक सामना खेळायचा आहे. अशा स्थितीत एकच संघ 16 गुणांपर्यंत पोहोचू शकतो.

त्याचवेळी आरसीबी आणि गुजरात टायटन्सला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. 2 विजयानंतरही हे संघ केवळ 14 गुणांपर्यंत पोहोचू शकतील. अशा स्थितीत या संघांना विजयासोबत नशिबाचीही गरज आहे. मात्र, सध्या आरसीबीचा नेट रन रेट चांगला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com