loksabha election
loksabha election solapur
महाराष्ट्र

सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी आजपासून अर्ज भरण्यास प्रारंभ! जिल्हाधिकारी कार्यालयात १५० पोलिस; कोणता उमेदवार कधी भरणार अर्ज? वाचा सविस्तर

तात्या लांडगे

सोलापूर : माढा व सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून (शुक्रवारी) उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. दोन्ही मतदारसंघासाठी उमेदवारांना सात रस्ता परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरता येणार आहेत. त्याठिकाणी २२ एप्रिलपर्यंत जवळपास १५० पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना दुसऱ्या मजल्यावरील जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्याची सोय करण्यात आली आहे. तर माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना पहिल्या मजल्यावरील अपर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. अर्ज भरण्यासाठी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत वेळ असणार आहे. दरम्यान, १२ ते २२ एप्रिल या काळात जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असणार आहे. त्यात सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यावेळी स्वतंत्र बंदोबस्त असणार आहे.

एकूण बंदोबस्तात १६ पोलिस अधिकारी, १०३ पोलिस अंमलदार आणि दोन ‘आरसीपी’ची पथके तैनात असणार आहेत. तसेच सोलापूर लोकसभेसाठी पोलिसांचे नोडल अधिकारी सहायक पोलिस आयुक्त अजय परमार तर माढ्यासाठी अशोक तोरडमल हे नोडल अधिकारी असणार आहेत.

उमेदवारांसाठी सूचना...

  • उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंत असणार वेळ

  • अर्ज दाखल करण्यासाठी येताना उमेदवारासोबत सूचक व इतर असे एकूण पाच व्यक्तींनाच प्रवेश

  • उमेदवारी अर्ज भरायला येताना उमेदवारास तीन वाहने घेऊन येता येतील

  • उमेदवारी अर्ज भरतानाचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे

निवडणुकीचा एकूण कार्यक्रम

  • उमेदवारी अर्ज भरणे : १२ ते १९ एप्रिल

  • अर्जांची छाननी : २० एप्रिल

  • उमेदवारी अर्ज माघार : २२ एप्रिल

  • मतदान : ७ मे

  • मतमोजणी : ४ जून

उमेदवार १५ एप्रिलनंतरच अर्ज भरण्याची शक्यता

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम सातपुते व माढा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे दोघेही १६ एप्रिलला अर्ज भरतील. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती राहील, असे पक्षातील पदाधिकारी सांगतात. दुसरीकडे सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या गुरुवारी (ता. १८) अर्ज भरतील. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उपस्थिती असेल. माढ्याचा महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाही, परंतु १६ तारेखला तेही उमेदवारी अर्ज भरतील. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे येण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT