महाराष्ट्र

डिसले गुरुजी जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागारपदी

प्रशांत काळे

देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून डिसले गुरुजींवर सोलापूर जिल्ह्यासह, राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बार्शी (सोलापूर) : बार्शी येथील जागतिक ग्लोबल टीचर (Global Teacher) पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsingh disley) गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार (world bank education advisor) म्हणून नियुक्ती झाली असून शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे. देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून डिसले गुरुजींवर सोलापूर जिल्ह्यासह, राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (appointment-of-global-teacher-ranjit-singh-disley-as-world-bank-education-advisor)

डिसले गुरुजींची जून 2021 ते जून 2024 अशा तीन वर्षाच्या कालावधीसाठी नेमणूक करण्यात आली असून जागतिक बॅंकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जगभरातील मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीमध्ये वाढ करण्याच्या हेतूने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणणे, शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे आदी उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत.

उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जगभरातील 12 व्यक्तींची सल्लागार म्हणून निवड केली आहे. समितीच्या माध्यमातून तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून 21 व्या शतकातील शिक्षक घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डिसले गुरुजींनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

'ग्लोबल टीचर'म्हणून नावाजलेल्या रणजितसिंह डिसले गुरुजी यांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती 'कार्लो मझोने-रणजित डिसले स्कॉलरशिप'नावाने 400 युरोंची ही शिष्यवृत्ती इटलीतील सॅमनिटे राज्यातील 10 विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. विद्यापीठस्तरावरील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. यासाठी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत. बेनव्हेंटोचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी या मुलांची निवड करणार असून पुढील 10 वर्षे 100 मुलांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

कोण आहेत डिसले गुरुजी ...

- डिसले गुरुजी ग्लोबल टीचर पुरस्कार 2020 चे विजेते

- युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा'ग्लोबल टीचर प्राईज'पुरस्कार विजेते.

- सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा पुरस्कार.

- लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी अधिकृत घोषणा केली होती.

- पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले होते.

- पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले.

- या रकमेतून नऊ देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल असा त्यांचा मानस.

ग्लोबल टिचर्स पुरस्कार नेमका आहे काय?

जगातील सर्वोत्तम 50 शिक्षकांची याकरिता निवड करण्यात आली आहे. लंडन येथील वार्की फाऊंडेशनच्या वतीने 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा हा पुरस्कार आहे. लंडन येथील ग्लोबल एज्युकेशन अँड स्किल फोरम कार्यक्रमात हा पुरस्कार रणजीत डिसले यांना प्रदान करण्यात आला. (appointment-of-global-teacher-ranjit-singh-disley-as-world-bank-education-advisor)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT