Industrial
Industrial 
महाराष्ट्र

कोरोनानं दिली नवा महाराष्ट्र घडवण्याची संधी; काय करावं लागणार?

निरंजन हिरानंदानी

औद्योगिक क्षेत्रातील चिनचे पहिले स्थान आता डळमळीत होत आहे, त्यामुळे आपल्याला नवे भविष्य घडविण्याची संधी आहे. महाराष्ट्राला विशेषतः कापड उद्योग क्षेत्रात पुन्हा नेतृत्व मिळवता येईल. त्याचबरोबर राज्याने पर्यटन क्षेत्रावरही भर दिला पाहिजे. कृषी क्षेत्राचा विस्तार, बॅंकिंग, अर्थक्षेत्र, ऊर्जा यांना बळकट केले की, हे ध्येय आपल्याला सहजसाध्य आहे.

महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर मुंबईत औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात झाले. हळूहळू पुणे, नाशिक, औरंगाबाद येथेही उद्योगांनी बाळसे धरले. मुंबई-पुणे येथे शिक्षण संस्थाही उभ्या राहिल्या. मुंबईत सेवा क्षेत्रही विस्तारले. मात्र गिरणी कामगारांच्या संपानंतर गिरण्या बंद पडल्या. शहरातील जमिनींचे दरही गगनाला भिडत गेले आणि मुंबईतील उद्योगही एक एक करून बाहेर पडू लागले. काही उद्योग नवी मुंबई, पुणे येथे तर काही उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले. तरीही रतन टाटा, अंबानी बंधू, बिर्ला समूह आदी उद्योगसमूहांमुळे मुंबई हा उद्योग क्षेत्राचा मुख्य तळ झाला. आता मुंबईत आयटी उद्योगाने चांगली पकड घेतली आहे. त्याचबरोबर शेअर बाजार, रिझर्व्ह बॅंक, आयुर्विमा महामंडळ, देशी-परदेशी बॅंकांची मुख्यालये यांच्यामुळे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी झाली. गृहनिर्माण क्षेत्र तर मुंबईत आकाशाकडेच झेपावले, पण याच क्षेत्रात काहीशी अधोगतीही मुंबईत झाली.

इतर राज्यांची स्पर्धा हे महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रासमोरील मुख्य आव्हान आहे, यात अनेक मुद्दे गुंतलेले आहेत. महाराष्ट्रात उद्योगांना जमीन लवकर मिळत नाही. सरकारच्या संमतीसाठी पुष्कळ वेळ लागतो. उद्योगांना प्रोत्साहन मिळत नाही. यासाठी सरकारने आपली धोरणे बदलली पाहिजेत, उद्योगांना सवलती दिल्या पाहिजेत.

दुसरा मुद्दा म्हणजे उद्योगांना रास्त दरात वीज मिळाली पाहिजे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचे वीजदर सर्वाधिक आहेत. गुजरात, कर्नाटक येथे हे दर कमी असल्याने अनेक उद्योग आता त्या राज्यांना पसंती देत आहेत.

तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्योगांसाठी जाचक असलेले कामगार कायदे बदलले पाहिजेत. आपल्याला वन ट्रिलियन इकॉनॉमीसाठी प्रयत्न करून प्रगती करायची आहे. कोरोनाचा फैलाव संपल्यावर आपल्याला त्यासाठी मोठी संधी आहे. ती आपण कोणत्याही परिस्थितीत साधलीच पाहिजे. महाराष्ट्राला विशेषतः कापड उद्योग क्षेत्रात पुन्हा नेतृत्व मिळवता येईल. त्याचबरोबर राज्याने पर्यटन क्षेत्रावरही भर दिला पाहिजे. कृषी क्षेत्राचा विस्तार, बॅंकिंग, अर्थक्षेत्र, ऊर्जा यांना बळकट केले की हे ध्येय आपल्याला सहजसाध्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

Hajipur Lok Sabha Result: वर्चस्वाच्या लढाईत वडिलांची जागा राखण्याचे चिराग यांच्यासमोर आव्हान

Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर

Shripad Joshi: बारावीपर्यंत मराठी कम्पलसरी करायला टाळाटाळ का? साहित्यिक श्रीपाद जोशींचा सवाल

SCROLL FOR NEXT