Hajipur Lok Sabha Result: वडिलांची जागा चिराग यांनी राखली, दीड लाखांनी मिळवला विजय

Chirag Paswan: जगात सर्वात प्रथम लोकशाहीला जन्म देणाऱ्या या वैशाली भूमीची सर्वात मोठी समस्या विकासाची असल्याचे तेथील लोक म्हणत असतात.
Chirag Paswan Hajipur Lok Sabha Result
Chirag Paswan Hajipur Lok Sabha ResultEsakal

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हाजीपूरमधून रामविलास पासवान यांचा मुलगा, लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान आणि राष्ट्रीय जनता दलाचे शिवचंद्र राम यांच्यात चुरशीची लढत होती.

यामध्ये लोजपचे रामविलास प्रमुख चिराग पासवान दीड लाख मतांनी विजय मिळवला आहे. यांनंतर लोजप रामविलास पक्षाने हाजीपूरमध्ये मोठ्या उत्सवाची तयारी केली आहे.

यापूर्वी 2014 आणि 2019 मध्ये जमुईमधून लोकसभा खासदार म्हणून काम केलेल्या चिराग यांनी आता हाजीपूरला आपल्या वडिलांची "कर्मभूमी" मानून येथून लढायचे ठरवले आहे.

एनडीएतून हाजीपूरची जागा मिळवण्यासाठी चिराग पासवान यांना चांगलाच संघर्ष करावा लागला होता. सुरुवातील, या मतदारसंघातून विद्यमान खासदार असलेले त्यांचे काका पशुपती कुमार पारस, मतदारसंघ सोडण्यास तयार नव्हते. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर पारस यांनी चिराग यांना उमेदवारी देण्यास तयार झाले.

मतदारसंघात कोणाची ताकद?

हाजीपूर हा बिहारमधील लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. राज्यात लोकसभेच्या 40 जागा आहेत. हाजीपूर मतदारसंघात हाजीपूर, लालगंज, महुआ, राजा पाकर, राघोपूर आणि महनार या सहा विधानसभा मतदारांचा समावेश आहे. हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती (SC) साठी राखीव आहे.

लोक जनशक्ती पक्ष (LJP), जनता दल-युनायटेड (JDU) आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) हे मतदारसंघातील प्रमुख पक्ष आहेत.

माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी 1977, 1980, 1989, 1996, 1998, 1999, 2004 आणि 2014 मध्ये आठ वेळा हाजीपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. बिहारचे माजी मुख्यमंत्री राम सुंदर दास यांनी 1991 आणि 2009 मध्ये दोनदा या मतदारसंघातून विजय मिळवला होता.

Chirag Paswan Hajipur Lok Sabha Result
Krishnanagar Lok Sabaha Result: डॅशिंग महुआ मोईत्रांना पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याची संधी, तृणमूलच्या बालेकिल्ल्यात मारणार बाजी?

मागचा निकाल काय?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत, लोकजनशक्तीचे उमेदवार पशुपती कुमार पारस यांनी 2,05,449 मतांच्या फरकाने प्रथमच जागा जिंकली. त्यांना 53.72% मतांसह 5,41,310 मते मिळाली. त्यांनी राजदचे उमेदवार शिवचंद्र राम यांचा पराभव केला ज्यांना 3,35,861 मते (33.33%) मिळाली.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत, लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान आठव्यांदा या जागेवरुन जिंकले. त्यांना 50.31% मतांसह 4,55,652 मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार संजीव प्रसाद टोनी यांना 2,30,152 मते (25.41%) मिळाली त्यांचा 2,25,500 मतांनी पराभव झाला.

Chirag Paswan Hajipur Lok Sabha Result
Lucknow Lok Sabha Result: भाजपच्या बालेकिल्ल्यात राजनाथ सिंह हॅट्रिकच्या तयारीत

स्थानिक मुद्दे

हाजीपूरच्या लोकांचे महत्त्वाचे स्थानिक मुद्दे हे प्रामुख्याने शहरी भागातील गटारी, विकास, शेती, महागाई, रोजगार या आहेत.

जगात सर्वात प्रथम लोकशाहीला जन्म देणाऱ्या या वैशाली भूमीची सर्वात मोठी समस्या विकासाची असल्याचे तेथील लोक म्हणत असतात.

माजी केंद्रीय मंत्री स्व. रामविलास पासवान 8 वेळा इथले खासदार होते. ते अनेक सरकारमध्येही सहभागी होते. परंतु, आश्वासने दिल्याप्रमाणे ते विकास करू शकलो नाहीत. हाजीपूर शहरात ड्रेनेजची सर्वात मोठी समस्या आहे. येथील केळी देशभरात प्रसिद्ध आहे मात्र शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com