Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkar  सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्र

'काश्मीर सोडा.. यशवंत जाधवांवर बोला', भातखळकरांचा राऊतांना टोला

सकाळ डिजिटल टीम

परमबीर सिंहांबाबत (Parambir Singh Case) सुप्रिम कोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर 'सामना'तून काल टिप्पणी करण्यात आली. आज पुन्हा 'सामना'तून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजवर निशाणा साधला आहे. मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) आणि त्यांच्या पक्षाला ताकत देण्याचं काम भाजपने केले आहे. त्यामुळे या सगळ्याला भाजपाच जबाबदार आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यावर भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्वीट करत संजय राऊत यांच्यावर ताशेरे ओढले.

अतुल भातखळकर ट्वीट द्वारे म्हणाले, जाऊ दे हो राऊत साहेब, काश्मीर मध्ये भाजपाने जे केलं तो तुमच्या आकलना पलीकडचा विषय आहे, तुम्ही तूर्तास यशवंत जाधवांवर बोला असे खडे बोल त्यांनी सुनावले.

शिवसेना नेते यशवंत जाधव प्रकरणात आयकर विभागाला काही महत्वाचे पुरावे सापडले. या तपासात त्यांना एक डायरीही सापडली ज्यात संशयास्पद नोंदी आढळून आल्या. या डायरीतील एका नोंदीमध्ये 'मातोश्री'ला ५० लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला 'मातोश्री'ला २ कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आहे. यावरून ही भातखळकर यांनी ट्वीट करत निशाणा साधला ते म्हणाले,धन्य तो यशवंत बाळ आणि धन्य ती कोट्याधीश मातोश्री!!

काय म्हणाले संजय राऊत

खूप आधीपासूनच पाकिस्तानच्या मेहबुबा मुफ्ती आणि भाजपाची खास मैत्री आहे. काश्मीर सोडवण्यासाठी पाकिस्तानसोबत चर्चा व्हावी असं वक्तव्य मुफ्ती यांनी केलं आहे. ते पाप भाजपाच आहे. मुफ्ती यांच्या पक्षाला ताकत देण्याच काम भाजपा करत आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी बिभव कुमारला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

शरद पवारांना धक्का! 'या' नेत्याची 'राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी; शिंदे म्हणाले, हातातोंडाशी आलेल्या मुलानं कायमस्वरूपी..

SCROLL FOR NEXT