महाराष्ट्र बातम्या

मित्राच्या आईवर उपचारासाठी विद्यार्थ्यांची धडपड

सकाळवृत्तसेवा

पाच लाखांची गरज; मदतीसाठी पुढे येण्याचे दानशूरांना आवाहन

औरंगाबाद - महाविद्यालयात शिकत असताना महाविद्यालयीन विविध उपक्रमांत सहभाग, करिअरचा विचार अन्‌ ‘कॉलेजकट्टा’वरील गप्पाष्टक रंगवीत असताना विद्यार्थी सामाजिक जाणिवेचाही विचार करतात. आपल्या ग्रुपमधील कोणाला किंवा कोणाच्या कुटुंबीयांना दुखले-खुपल्याचे कळले तर त्यांची मने हेलावतात. कुणी आजारी पडले तर मदतीसाठी धडपड करतात... दाखवून दिले आहे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी. मित्राची आई गंभीर आहे. तिच्यावर उपचारासाठी पाच लाख रुपये हवे आहेत. विद्यार्थी फुल ना फुलाची पाकळी जमवतायत; पण मर्यादा आहेत. ते दानशूरांना पुढे येण्याचे आवाहनही करीत आहेत...

घरची स्थिती हलाखीची. वडिलांच्या मोलमजुरीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह. अठराविश्‍वे दारिद्र्याने त्रस्त असतानाच आईचा गंभीर अपघात झाला. अशा स्थितीत महाविद्यालयीन मित्रांच्या आर्थिक सहकार्याने उपचारही सुरू झाले; पण अजूनही मोठ्या रकमेची गरज आहे. ही रक्कम मिळाल्यास त्याची आई बरी होणार आहे; पण एवढी मोठी रक्कम जुळवावी कशी, असा प्रश्‍न त्याच्यासमोर उभा ठाकला. समाजातील दानशूरांनी मदत केल्यास ती माऊली बरी होऊ शकते, हे कळताच विद्यार्थ्यांत अस्वस्थता निर्माण झाली. मदत गोळा करण्यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आकाश दारव्हेकरच्या (रा. जयभवानीनगर) आई सुलोचना यांचा ११ सप्टेंबरला अपघात झाला. यात त्यांच्या डोक्‍याला जबर मार लागला. त्यांना उपचारासाठी एमआयटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच दिवशी त्यांच्या ब्रेनच्या उजव्या बाजूने सर्जरी झाली. तिसऱ्या दिवशी परत डाव्या बाजूने सर्जरी करण्यात आली. एकूण खर्च सुमारे पाच लाखांच्या घरात जाणार आहे. उपचारासाठी दाखल केल्यानंतर तत्काळ शस्त्रक्रिया करावी लागल्यामुळे त्यांना राजीव गांधी योजनेचा लाभही मिळू शकला नाही. यामुळे हादरलेल्या आकाशला त्याच्या वर्गमित्रांनी आधार दिला. महाविद्यालय व विद्यार्थ्यांकडून थोडी रक्‍कम उभी करून उपचार केला; मात्र अजूनही आकाशची आई अतिदक्षता विभागात आहे. यामुळे उर्वरित खर्च जमा झाल्याशिवाय पुढील उपचार होणे शक्‍य नाही. दानशूर व्यक्‍तींनी मदत करावी, असे आवाहन आकाश व त्यांच्या वर्गमित्रांतर्फे करण्यात आले आहे. 

‘ती’ही आमचीच आई...
आकाश दारव्हेकर आमचा वर्गमित्र आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून स्वत:च्या हिमतीवर शिक्षण घेत आहे; पण त्याच्या आईचा अपघात झाल्याने तो कोलमडला आहे. त्याची आई आमच्याच आईसारखी आहे. त्यामुळे आम्ही सर्व मित्रांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्याकडून सत्तर हजारांची मदत जमवून उपचारासाठी दिली, असे काही विद्यार्थी-विद्यार्थिनींनी थेट ‘सकाळ’ कार्यालयात येऊन सांगितले.

अशीही आर्त हाक...
मैत्री आणि सहकार्य कसे असावे, ही बाब अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून शिकण्याजोगी आहे. त्यांच्या मोलाच्या मदतीमुळेच आकाशच्या आईवर उपचार सुरू आहेत. हेच विद्यार्थी सोशल मीडिया व प्रत्यक्ष विविध ठिकाणी भेटी देऊन मदतीसाठी धडपड करीत आहेत. ‘आकाशच्या आईसाठी 
प्लीज मदत करा...’ अशी आर्त हाक या विद्यार्थ्यांनी समाजाला दिली आहे.

या खात्यावर करा मदत
Name :  Akash Vinayak Daravekar 
Bank : SBI Bank, N-२, Kamgar Chowk, Cidco, Aurangabad 
account no : ६२३००३६०००७
Ifsc code : 
SBIN002180

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: मुंबईत भरतीचा इशारा; अनेक भागात मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Intel Layoffs 2025 : ‘इंटेल’ने घेतला मोठा निर्णय! यावर्षात तब्बल २४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Asia Cup 2025 स्पर्धेच्या तारखा अन् ठिकाण ठरलं! ACC अध्यक्षांची घोषणा, पण भारत-पाकिस्तान सामना...

Crime: मेव्हणीवर एकतर्फी प्रेम, साढूवर संताप; वेड्या दाजीनं दोन चिमुकल्यांना शिकार बनवलं अन्...; संतापजनक कृत्य

Latest Maharashtra News Updates : पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT