Solapur neurosurgeon Dr. Shirish Valsangkar’s suicide case esakal
महाराष्ट्र बातम्या

आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर मुलाला म्हणाले..! ‘मनीषामुळे होणारा त्रास विसरू शकत नाही, सहनही करू शकत नाही, मी जीवन संपविण्याचा निर्णय घेतलाय’; जामिनावर १७ जूनला सुनावणी

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकरांनी आत्महत्या करून ५३ दिवस उलटले आहेत. अटकेतील संशयित आरोपी मनीषा मुसळे मानेंच्या जामिनावर सरकारी पक्षाने सोमवारी न्यायालयात म्हणणे सादर केले. त्यात पोलिसांच्या तपासातील काही ठळक बाबी मांडण्यात आल्या असून, सरकारी पक्षाने मनीषा यांच्या जामिनास तीव्र विरोध केला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकरांनी आत्महत्या करून ५३ दिवस उलटले आहेत. अटकेतील संशयित आरोपी मनीषा मुसळे मानेंच्या जामिनावर सरकारी पक्षाने सोमवारी (ता. ९) न्यायालयात म्हणणे सादर केले. त्यात पोलिसांच्या तपासातील काही ठळक बाबी मांडण्यात आल्या असून, सरकारी पक्षाने मनीषा यांच्या जामिनास तीव्र विरोध केला आहे. डॉ. वळसंगकरांनी १८ एप्रिलला आत्महत्येपूर्वी दीड तास आधी मुलगा डॉ. अश्विन यांना, आपण मनीषाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे फोनवरून व प्रत्यक्ष भेटून सांगितल्याची बाब समोर आली आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा या १७ वर्षांपासून त्या ठिकाणी कार्यरत होत्या. डिसेंबर २०२४ पासून त्यांचे प्रशासकीय अधिकार काढून कर्मचाऱ्यांसमोर त्यांना किंमत दिली जात नव्हती. त्यामुळे मनीषा यांनी १७ एप्रिल रोजी डॉ. शिरीष, त्यांची पत्नी डॉ. उमा व मुलगा डॉ. अश्विन, सून डॉ. शोनाली यांना ई-मेल करून आपल्याला न्याय मिळावा, अन्यथा आपण दोन्ही मुलांना मारून स्वत: रुग्णालयाबाहेर जाळून घेऊन आत्महत्या करणार असल्याचे म्हटले होते. पण, मनीषाचा तो ई-मेल, त्यांनी दिलेली धमकी आणि रुग्णालयात केलेल्या आर्थिक गैरव्यवहारामुळे डॉ. शिरीष यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आता मनीषा यांच्या जामीन अर्जावर १७ जून रोजी सुनावणी होणार असून, त्यांचे वकील प्रशांत नवगिरे यांच्या युक्तिवादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तपासातील ठळक मुद्दे...

  • १७ एप्रिलला दुपारी ४.०७ वाजता मनीषा यांनी केला डॉक्टरांना ई-मेल, पाच वाजता डॉ. शिरीष, पत्नी डॉ. उमा व मुलगा डॉ. अश्विन यांची हॉस्पिटलमध्ये चर्चा सुरू असताना अचानक मनीषा तेथे आल्या आणि ई-मेलची प्रत डॉ. अश्विन यांच्या हाती सोपवून ताडकन निघून गेल्या.

  • १७ एप्रिललाच दुपारी ४.३८ ते सायंकाळी ५.१५ वाजेपर्यंत (३७ मिनिटे) आणि त्यानंतर सायंकाळी ५.४२ ते ६.०१ या वेळेत (१९ मिनिटे) मनीषा या डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या केबिनमध्ये थांबल्या. त्या वेळेत मनीषाने डॉक्टरांना आत्महत्येस उद्युक्त केल्याचे पोलिसांचे म्हणणे.

  • १८ एप्रिलला सायंकाळी ६.३० ते ७.१५ या वेळेत डॉक्टरांनी मुलगा डॉ. अश्विन यांना भेटून व फोनवरून मनीषाच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. रात्री ८.४० वाजता डॉक्टरांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली.

  • १८ एप्रिल रोजी डॉ. शिरीष यांना त्यांच्याच रुग्णालयात उपचारासाठी नेले, त्यावेळी त्यांच्या अंगावरील कपडे काढण्यात आले. ते कपडे ‘पीएसआय’कडे दिले, त्यांनी ते हवालदाराच्या ताब्यात दिले.

  • १९ एप्रिलला पंचनामा करताना कपड्यांची झडती घेतली, त्यावेळी डॉक्टरांनी लिहिलेली सुसाईड नोट पँटच्या खिशात सापडली. त्यावरील हस्ताक्षर मुलगा डॉ. अश्विन यांनी ओळखले. त्याच दिवशी रात्री ११ वाजता मनीषा यांना अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: संसदेच्या बाहेर लोक गोळा करायचे अन् बालिश चाळे...; शिंदे खासदाराची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

IND vs ENG 5th Test: ८ वर्षांनी संधी मिळाली, पण Karun Nair ने माती केली! कसोटी कारकीर्द संपल्यात जमा, कारण...

Latest Maharashtra News Updates Live: रेल्वे कर्मचाऱ्यांवर हल्ला

Badlapur Accident: बदलापुरात भीषण अपघात! ट्रकचे नियंत्रण सुटले, अनेक गाड्यांना धडक; एकाचा मृत्यू, ७ जण जखमी

Pali News : सरसगड किल्ल्यावरून पडून तरुण गंभीर जखमी; डोक्याला इजा, खांदा फॅक्चर

SCROLL FOR NEXT