Bhausaheb and Mangal Kale Ahmednagar esakal
महाराष्ट्र बातम्या

जीवनाचं सार्थक झालं! तब्बल 30 वर्षे पायी वारी करणाऱ्या 'या' दाम्पत्याला मिळाला शासकीय पूजेचा मान!

आज आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा केली.

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील वाकडी गावातील काळे दाम्पत्याला यंदा पूजेचा मान मिळाला आहे.

पंढरपूर : आज आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा केली. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना दुसऱ्यांदा पूजेचा हा मान मिळाला.

तसंच अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील वाकडी गावातील काळे दाम्पत्याला यंदा पूजेचा मान मिळाला आहे. भाऊसाहेब आणि मंगल काळे हे गेल्या 30 वर्षांपासून पंढरीची पायी वारी करत आहेत. भाऊसाहेब व्यवसायानं शेती करतात.

हा मान मिळाल्यानं दाम्पत्याला गहिवरून आलं. आज एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे दर्शन व्हावे यासाठी ते सकाळी सहा वाजता रांगेत उभा राहिले होते. गेल्या तीस वर्षांपासून कोरोनाचा दोन वर्षांचा अपवाद वगळता न चुकता जोडीनं त्यांनी वारी केलीये.

असा महापूजेचा मान मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. हे सर्व कर्ता करविता तो पांडुरंग आहे. आज आमच्या जीवनाचं सार्थक झालं, आम्ही धन्य झालो. आम्हाला दोन मुलं अन् दोन मुली आहेत. आम्ही देवगड संस्थानच्या दिंडीतून पायी वारी करतो, असं मानाच्या वारकऱ्यांनी यावेळी सांगितलं. हा मान मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

मुख्यमंत्री शिंदेंचे विठुरायाला साकडे

आषाढीनिमित्त शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी विठुरायाकडं बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना चांगले दिवस येऊ देत. पाऊस चांगला पडू दे. राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, असे मागणे मागितले. तसेच महापूजेनंतर आयोजित सत्कार सोहळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरच्या विकास आराखड्यासह इतर अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनकडून पुन्हा अपेक्षाभंग! बाद होताच सन्नाटा, डग आऊटमध्ये गौतम गंभीरने काय केले ते वाचा? सारेच चक्रावले

India Semi-Final Scenario: द. आफ्रिकेच्या विंडीजवरील विजयानं भारताचं नेट रन रेटचं टेन्शन झालं कमी! आता कसं आहे सेमीफायनलचं समीकरण?

Shivraj Singh Chouhan News : शेतकऱ्यांसाठी Good News!, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले..

SCROLL FOR NEXT