higher education news sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठा निर्णय! नापास झालेल्या विद्यार्थ्यांनाही आता पुढच्या वर्गात प्रवेश; समितीच्या अहवालानंतर विद्यापीठाचा निर्णय; ‘एन प्लस-2’वर अजूनही निर्णय नाहीच

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने घेतलेल्या ‘कॅरिऑन’च्या निर्णयानुसार आता पदवी, पदव्युत्तर पदवीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना विनाथांबा थेट पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. विद्यापीठाने नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालानंतर कॅरिऑनचा निर्णय घेतल्याची माहिती प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने घेतलेल्या ‘कॅरिऑन’च्या निर्णयानुसार आता पदवी, पदव्युत्तर पदवीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना विनाथांबा थेट पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. विद्यापीठाने नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालानंतर कॅरिऑनचा निर्णय घेतल्याची माहिती प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

पहिल्या वर्षात एक-दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षात प्रवेश मिळतो, पण पहिल्या वर्षातील सर्व विषयात उत्तीर्ण झाल्याशिवाय द्वितीय वर्षात पास होऊनही त्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या वर्षात प्रवेश मिळत नाही. पण, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांच्या मागणीनुसार कुलगुरू डॉ. महानवर यांनी डॉ. शशिकांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. हणमंत आवताडे, डॉ. सोनाली गायकवाड, डॉ. प्रशांत पवार व विद्यापीठाचे कायदा अधिकारी जावेद खैरादी यांची समिती नेमली.

या समितीने अभ्यास करून त्यांचा अहवाल विद्यापीठाला सादर केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबविता येणार नाही, असा अभिप्राय काही सदस्यांनी दिला होता. त्यानुसार विद्यापीठाने विद्यार्थी हितासाठी म्हणून कॅरिऑनचा निर्णय घेतला. सध्या द्वितीय किंवा तिसऱ्या वर्षात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना (अनुत्तीर्ण) या निर्णयाचा फायदा होणार आहे.

कॅरिऑन म्हणजे नेमकं काय?

पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेताना पहिल्या, दुसऱ्या वर्षातील काही विषयात अनुत्तीर्ण झाला किंवा पूर्णत:च नापास झाल्यास त्या विद्यार्थ्यास थेट पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. पूर्वी पहिल्या वर्षातील अनुत्तीर्ण विषयात उत्तीर्ण असल्याशिवाय द्वितीय वर्षात उत्तीर्ण होऊनही तिसऱ्या वर्षाला प्रवेश मिळत नव्हता. विद्यापीठाने नेमलेल्या पाच सदस्यीय समितीचा अहवाल सादर झाल्यानंतर विद्यापीठाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी कॅरिऑनचा निर्णय घेतला आहे.

‘एन प्लस- टू’चीही मोठी गरज, पण...

पास आणि नापास ही शिक्षणातील परंपरागत पद्धत आहे, पण कॅरिऑनमधील सुधारणेनुसार आता विद्यार्थी नापास झाला तरी तो पदवीच्या शेवटच्या वर्षापर्यंत थेट प्रवेश मिळवू शकतो. दुसरीकडे मात्र, काही अडचणींमुळे पाच, सात वर्षांच्या मुदतीत पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही पुढे शिकता येत नाही. त्याचे कारण म्हणजे विद्यापीठाने अजूनही ‘एन प्लस- टू’चा निर्णय घेतलेला नाही. तो निर्णय झाल्यानंतर उच्च शिक्षण अर्ध्यात थांबलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dussehra Rally Speech: ‘’मी वर्क फ्रॉम होम अन् फेसबुक लाईव्ह करणारा नाही’’, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

आर्थिक फायदा; पण सुरक्षेवर ताण येणार! दुकाने २४ तास खुली ठेवण्याचा सरकारचा प्रयोग किती यशस्वी ठरणार? वाचा पडद्यामागचं गणित

IND vs WI, 1st Test Video: ध्रुव जुरेलच्या विकेटकिपिंगने जिंकली मनं! सूर मारत चेंडू आडवत टीकाकारांना दिलं उत्तर

Shivsena Dasara Melava: ''...ही गोष्ट मान्य केली पाहिजे'', लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरे भाजपवर बोलले

Dussehra Melava 2025 Live Update: हिंदुत्व म्हणजे टी-शर्ट आहे का?- एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT