दारू विक्री कमी

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! दारूचे दर वाढले अन्‌ विदेशी दारूचा खप झाला कमी; बनावट दारू व हातभट्टीची वाढली विक्री; दुकानदारांकडूनही हिशेबात चलाखी, वाचा...

राज्यात देशी-विदेशी दारूच्या किमतीत जुलैपासून वाढ झाली. दरवाढीनंतर विदेशी दारूच्या विक्रीत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जुलै ते नोव्हेंबर या काळात सव्वातीन लाख लिटरने विदेशी दारुची विक्री कमी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी यंदा ५२६ कोटींच्या महसुलाचे उद्दिष्ट्ये असून डिसेंबरपर्यंत ३३४ कोटींचा महसूल मिळाला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात देशी-विदेशी दारूच्या किमतीत जुलैपासून वाढ झाली. दरवाढीनंतर विदेशी दारूच्या विक्रीत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जुलै ते नोव्हेंबर या काळात सव्वातीन लाख लिटरने विदेशी दारुची विक्री कमी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी यंदा ५२६ कोटींच्या महसुलाचे उद्दिष्ट्ये असून डिसेंबरपर्यंत ३३४ कोटींचा महसूल मिळाला आहे. मार्चपर्यंत १९२ कोटींचा महसूल मिळविण्याचे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागापुढे आहे.

जुलैपासून विदेशी दारुवरील कर (एक्साईज ड्यूटी) ३५० टक्क्यांवरून आता ७५० टक्के करण्यात आला आहे. देशी दारुवरील कर २२० टक्क्यांवरून २३५ टक्के झाला. महाराष्ट्रनिर्मित दारूवर २७० टक्केच टॅक्स असल्याने विदेशी दारूच्या तुलनेत महाराष्ट्रनिर्मित मद्यविक्री वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षी जुलै ते नोव्हेंबर या काळात ५६ लाख लिटर विदेशी दारू विक्री झाली, पण यंदा याच काळात विक्री सव्वातीन लाख लिटरने घटली आहे.

दुसरीकडे बिअरची विक्री एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत सहा लाख लिटरने वाढली आहे. तसेच देशी दारुची विक्री देखील सव्वादोन लाख लिटरने वाढलेली आहे. केवळ, विदेशी दारूच्या विक्रीत घट झाल्याने महसुलाचे १०० टक्क्यांचे टार्गेट अपूर्ण असल्याची सद्य:स्थिती आहे. मद्यपींनी विदेशी दारूला बगल देत देशी दारू, बिअरला पसंती दिल्याचे दिसते. देशी-विदेशी दारूच्या दरवाढीमुळे जिल्ह्यातील गावागावांमध्ये हातभट्ट्या पेटल्याचे चित्र आहे.

सोलापुरात विदेशी दारुतील घट अशी...

  • महिना २०२४-२५ २०२५-२६

  • जुलै ९,१७,७१६ ८,५०,०१८

  • ऑगस्ट ८,१३,१८४ ५,७४,००१

  • सप्टेंबर ८,११,६०७ ६,०७,५७६

  • ऑक्टोबर ८,६०,७८४ ७,११,२४७

  • नोव्हेंबर ८,६२,१८१ ७,१०,१९१

  • एकूण ४२,६५,४७२ ३४,५३,०३३

मद्यविक्री दुकानांच्या हिशेबाची तपासणी

मद्यविक्रीच्या दुकानांमध्ये हिशेब लिहिण्यासाठी एक-दोन कर्मचारी असतात. ते आठवड्यातून एक-दोन दिवस येऊन हिशेब लिहितात. त्यावेळी ते मागील काही दिवसातील विक्री अंदाजे लिहितात. या पार्श्वभूमीवर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकांकडून दुकानांमध्ये आलेला मद्यसाठा व प्रत्यक्षातील विक्री, याची पडताळणी केली जात आहे. देशी-विदेशी दारू, बिअर शॉपींसह अन्य मद्यविक्री दुकानांचा हिशेब आता तपासला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोनं–चांदीचा नवा उच्चांक! ५ दिवसांत तब्बल २०,००० रुपयांची वाढ; पाहा तुमच्या शहरातील आजचा भाव

How to Reach NMIA : नवी मुंबई विमानतळ आजपासून सुरु… पण Airport वर पोहोचण्यासाठी सर्वोत्तम-जलद मार्ग कोणता?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडी गायब होणार, कसा असेल हवामान अंदाज

Solapur News: सुंच आठ वर्षांपासून चालवत होता किडनी विक्रीचे रॅकेट; एका किडनीमागे सव्वा कोटी, मुलीच्या वडिलांनीही दिला होता नकार!

Viral Video : रोहित भाऊ, वडापाव खाणार का? प्रेक्षकांमधून मिळाली आवडत्या पदार्थाची ऑफर; भारी होती हिटमॅनची रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT