bjp, Shivsena 
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेने कितीही आग्रह धरला तरी यापेक्षा जास्त नाही; भाजपचे मत

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई : शिवसेनेला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि महत्त्वाच्या शहरात किमान एक जागा हवी आहे. त्यांचा आग्रह कितीही असला तरी 110 ते 115 च्यावर एकही जागा देणे उचित वाटत नाही, हे कानावर घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील सकाळीच दिल्लीत दाखल झाले आहेत. पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून योग्य ते प्रत्यक्षात आणले जाईल असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले. 

त्या 38 जागांचा वाद 
गेल्या निवडणुकीत 2014 साली शिवसेनेना पराभूत करत भाजपने जिंकलेल्या जागा हा सर्वात मोठा वादविषय आहे. या जागा शिवसेनेला हव्या आहेत, त्या देणे कसे शक्‍य आहे असा भाजपचा सवाल आहे.मात्र या जागा पारंपारिक असल्याने युतीधर्म निभवावा असे सेनेचे म्हणणे आहे. दोन्ही पक्षांशी संबंधित असलेल्या एका माहितगाराने 40 जागांवरून वाद आहेत असे मान्य केले. सेनेने किती जागा लढायच्या याच बरोबर कोणते मतदारसंघ मागायचेच हे दोन्ही त्यांच्या पक्षातले वादाचे मुद्‌दे झाले आहेत असे समजते. 

हे मतदारसंघ वादविषय 
पुण्यातील कोथरूड, कॅन्टोन्मेंट, हडपसर हे मतदारसंघ सेनेला हवेत. नाशिक येथे भाजपच्या सीमा अहेर तसेच माजी मंत्री डॉ. दौलतराव अहेर यांचे पुत्र डॉ. राहुल यांनी जिंकलेल्या मतदारसंघांवर सेनेने दावा केला आहे. धुळे शहर मतदारसंघातून अनिलअण्णा गोटे यांनी भाजपला अडचणीत आणले, तो मतदारसंघ आता आम्हाला दया असे सेना म्हणते. सोलापूर येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी जिंकलेला मतदारसंघ आम्हाला हवा आहे असे सेनेचे म्हणणे आहे.आमचा पक्ष वाढवण्यासाठी आम्हाला संधी दया असे म्हणणे अयोग्य आहे काय असे सेनेचे म्हणणे आहे तर सेनेचे उमेदवार जिंकून येणे अशक्‍य असताना आग्रह कशाचा असा भाजपचा प्रश्‍न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badlapur Accident: बदलापुरात भीषण अपघात! ट्रकचे नियंत्रण सुटले, अनेक गाड्यांना धडक; एकाचा मृत्यू, ७ जण जखमी

Pali News : सरसगड किल्ल्यावरून पडून तरुण गंभीर जखमी; डोक्याला इजा, खांदा फॅक्चर

दररोज एकजण येतो आणि काहीही बरळून जातो... पांढरा केस जपून ठेवण्यावरून शर्मिष्ठा राऊत ट्रोल; नेटकरी म्हणतात, 'डोक्यात फरक ...'

Madhuri Elephant: हा देश अंबानीच्या मुलाच्या वडिलांचा…; महादेवीसाठी कुणाल कामरा मैदानात, नव्या ट्विटनं पुन्हा अडचणीत येणार?

Latest Maharashtra News Updates Live: पाचोर्‍यातील कृष्णापुरीतील उपद्रवी माकडाला पकडण्यात यश

SCROLL FOR NEXT