महाराष्ट्र

Loksabha 2019 : जास्तीत जास्त खासदारांसाठी... 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी भाजप-शिवसेनेने युतीत उमेदवारांची सेटलमेंट करण्याची रणनीती आखली आहे. त्याचबरोबर भाजपने आयारामांना पायघड्या घालण्याचे धोरण अवलंबले आहे. 

शिवसेना सातारा लोकसभा मतदारसंघ लढवत आहे. या ठिकाणी त्यांच्याकडे उमेदवार नसताना भाजपने शिवसेनेला मदत केली. या मतदारसंघात मूळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे, मात्र भाजपमध्ये गेलेले नरेंद्र पाटील यांना रातोरात शिवबंधनात अडकवले. "मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पाटील यांनी भेट घेतली. त्यानंतर साताऱ्यामधून पाटील यांनी प्रचाराला सुरवात केली. याचबरोबर शिवसेनेने पालघरची जागा प्रतिष्ठेची करीत भाजपकडून युती करताना खेचून घेतली. त्यानंतर पालघरमध्ये सक्षम उमेदवार नाही म्हणून पालघरचे भाजपचे खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेत प्रवेश दिला आणि त्यांच्या खांद्यावर भगवा दिला. भाजपनेही या दोन ठिकाणी उदार मनाने शिवसेनेला उमेदवार दिले. या लोकसभा निवडणुकीत राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणणे हे भाजपचे उद्दिष्ट असून, यासाठी मित्रपक्ष शिवसेनेबरोबर उदार मनाने तडजोड करणे, ही रणनीती भाजपने आखल्याचे सांगितले जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT