Chandrakant Patil
Chandrakant Patil 
महाराष्ट्र

युती शंभर टक्के होणार; 220 पेक्षा जास्त जागा जिंकू : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून, भाजप-शिवसेना यांच्यात शंभर टक्के युती होणार आहे. याची घोषणाही लवकरात लवकर होईल. राज्यात आम्ही 220 पेक्षा जास्त जागा जिंकू, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (शनिवार) विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान होत असून, 24 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. अवघा महिनाभराचा कालावधी असला तरी युतीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याविषयी चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, की युतीमध्ये घटकपक्षांनाही योग्य स्थान देण्यात येईल. राज्यातील सर्व मतदारसंघात युतीचा उमेदवार म्हणून भाजपचे कार्यकर्ते काम करतील. शिवसेना आणि भाजपमध्ये 220 जागांवर एकमत झाले आहे. महाजनादेश यात्रेचा युतीला फायदा झाला. लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणे आमच्या हातात नसले तरी विधानसभेसाठी उदयनराजे पूर्ण ताकदिनीशी मदत करतील. युती झाली तर बंडखोरीची शक्यता नाही. त्या कार्यकर्त्यांना समजावण्याची व्यवस्था आहे. सरकार आमचेच येईल, याचा विश्वास आहे. शिवसेनेला किती जागा द्यायच्या यावर चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मिळून निर्णय घेतील. 220 पेक्षा जास्त जागा आम्हाला मिळतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT