Samruddhi Mahamarg Bus Accident esakal
महाराष्ट्र बातम्या

Bus Accident : किंकाळ्या, आरोळ्या अन् मृत्यूचं तांडव! बुलढाण्यात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, कशी घडली दुर्घटना?

समृद्धी महामार्गावरून (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची घटना समोर आलीये.

सकाळ डिजिटल टीम

बसमधील जखमींना तातडीनं उपचारासाठी बुलढाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते.

Buldhana Accident : समृद्धी महामार्गावरून (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची घटना समोर आलीये. बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्स खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झालाय.

चालकाला झोप लागल्यामुळं बस थेट डिव्हायरला धडकली. या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. सिंदखेडराजा परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडलीये. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते.

बसमधील जखमींना तातडीनं उपचारासाठी बुलढाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यातील आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.

या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. ही बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर रस्ता दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला. डिझेलच्या संपर्कात आल्याने बसने वेगाने पेट घेतला. यात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

प्रवासी गाडीच्या काचा फोडून आले बाहेर

ही बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली. त्यानंतर ही बस रस्ता दुभाजकाला धडकली. त्यानंतर बस पलटी झाली. बसचा दरवाजा गाडीखाली आल्यानं कोणालाच बाहेर येता आलं नाही. वाचलेले प्रवासी गाडीच्या काचा फोडून बाहेर आले.

बसचे दार खाली दबले

पोलीस आणि घटनास्थळी असलेल्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, बस सर्वात आधी नागपूरवरून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उजवीकडे एका लोखंडी पोलला धडकली. अनियंत्रित होऊन पुढं जाऊन येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही लेनच्या मध्ये असलेल्या काँक्रिटच्या दुभाजकाला धडकली आणि पलटली. बस पलटी होताना डाव्या बाजूने पलटली. त्यामुळं बसचे दार खाली दाबले गेले. त्यामुळं लोकांना बाहेर पडण्यासाठी मार्ग नव्हता. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर बसमधील डिझेल सांडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: शेअर बाजार सपाट पातळीवर बंद! कोणते सेक्टर दबावात? जाणून घ्या आजचा मार्केट ट्रेंड

Baramati Plane Crash : बारामतीत अजितदादांच्या विमानअपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांची पोलिस ठाण्यावर धडक...

Lohgaon Crime : विवाहितेच्या छळप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आरोपी पोलीस ठाण्यात हजर

Latest Marathi News Live Update : 148 महाड MIDC मधील एम्बॉलो कंपनीला पुन्हा आग; परिसरात भीतीचे वातावरण

Baramati Plane Crash : बारामती विमान अपघाताचा तपास योग्य दिशेने; सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांची माहिती

SCROLL FOR NEXT