महाराष्ट्र

मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात 

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार आणि खांदेपालट या महिन्याच्या पुढील आठवड्यात करणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपच्या श्रेष्ठींशी सल्लामसलत केल्यानंतर फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असून कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले राधाकृष्ण विखे-पाटील यांना कृषी खाते दिले जाण्याची शक्‍यता आहे. भाजप-शिवसेनेच्या काही मंत्र्यांचे खांदेपालटही होणार असल्याचे समजते. 

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 17 जून रोजी सुरू होणार असून त्यापूर्वी हा विस्तार होणार आहे. या विस्तारापूर्वी येत्या रविवारी (ता. 9) भाजपच्या कोअर कमिटीचे सर्व नेते दिल्लीत पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी जाणार असून त्यानंतर हा विस्तार 11 जून रोजी होण्याची शक्‍यता आहे. 

येत्या ऑक्‍टोबरमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्यासाठी आचारसंहिता सप्टेंबर महिन्यात लागणार आहे. त्यामुळे हा शेवटचा विस्तार आणि खांदेपालट आहे. यानंतर निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले गिरीश बापट यांच्याकडील खात्याचा कारभार फडणवीस यांनी अन्य मंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे. 

तावडे विधिमंडळ कमकाजमंत्री 
बापट यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खाते पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांना देण्यात आले आहे, तर बापट यांच्याकडील विधिमंडळ कामकाज खात्याचा कारभार शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. 

पाटील पुण्याचे, महाजन जळगावचे पालकमंत्री 
बापट यांच्याकडील पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले आहे. पाटील यांच्याकडील जळगावचे पालकमंत्रिपद जळगाव जिल्ह्यातील भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले आहे. 

"अण्णाभाऊ'च्या अध्यक्षपदी गोरखे 
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित मुंबई या महामंडळाच्या अध्यक्षपदी पुणे येथील अमित गणपत गोरखे यांची नेमणूक करण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने याबाबतचा शासनादेश काढला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT