महाराष्ट्र

Loksabha 2019 : प्रचार ‘हीट’

सकाळवृत्तसेवा

मुंबई -  राज्यातील सार्वत्रिक निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडल्याने प्रचाराचा पारा शिगेला पोचला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संगमनेर येथे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक येथे जाहीरसभा घेत प्रचाराची राळ उडवून दिली. 

मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्लेक्‍समध्ये झालेल्या महायुतीच्या पहिल्या विजय संकल्पसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचत पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच (एनडीए) मतदान करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. 

या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते. नाशिकमध्ये ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेवटच्या जाहीरसभेत केंद्र आणि राज्य सरकारचे अक्षरशः वाभाडे काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना धारेवर धरले. काहीशा विलंबाने सुरू झालेल्या संगमनेर येथील सभेत बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अनिल अंबानींना हजारो कोटी रुपयांचा लाभ मिळवून देणाऱ्या ५६ इंचाच्या छातीने तरुणांना मात्र रोजगार मिळवून दिला नाही, असा टोला पंतप्रधान मोदींना  लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

T20 Cricket: 12 धावात खेळ खल्लास! तब्बल 6 फलंदाज भोपळाही फोडला नाही; टी20 सामन्यात झाला अनोखा विक्रम

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

SCROLL FOR NEXT