Tenth twelfth exams offline Board of Education sakal
महाराष्ट्र बातम्या

CBSE परीक्षा ऑफलाईन होणार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

सकाळ डिजिटल टीम

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनमार्फत येत्या 26 एप्रिलपासून इयत्ता 12 वी आणि 10 वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. या शैक्षणिक वर्षातील दुसऱ्या सत्रात परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आयोजित होणार आहेत. परीक्षेच्या आधी, बोर्ड लवकरच त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपत्र जारी करणार आहे. (CBSE Board Exams 2022)

सर्वात महत्वाचं म्हणजे पहिल्या सत्रात असणारे रोल नंबर यंदाही समान असतील. CBSE लवकरच टर्म 2 परीक्षांसाठी नवीन हॉल तिकीट जारी करणार आहे. (CBSE Board Exams Latest News)

त्यामुळे प्रवेशपत्राची नेमकी तारीख अद्याप बोर्डाने जाहीर केलेली नाही. नवीन आणि जलद अपडेटसाठी, विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटला cbse.gov.in भेट देणं महत्वाचं असणार आहे. एकदा प्रवेशपत्र जारी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी या वेबसाइटवरून त्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करणं गरजेचं आहे. केवळ वेबसाइटवरूनच नाही तर विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेशपत्र त्यांच्या संबंधित शाळांमधून देखील मिळणार आहेत.

प्रवेशपत्र कसं डाऊनलोड करायचं.. ते जाणून घ्या!

  • सीबीएसईची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in या वेबसाईटवर जा

  • मुख्यपृष्ठावर दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि इयत्ता 10/वर्ग 12 टर्म 2 प्रवेशपत्र निवडा. तुम्हाला एक नवीन वेबपेज दिसेल.

  • तुमच्या यूजर आयडी आणि पासवर्डने लॉग इन करा. नंतर स्क्रीनवर अॅडमिट कार्ड दिसेल ते डाऊनलोड करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

SCROLL FOR NEXT