NEET Exam 
महाराष्ट्र बातम्या

NEET Exam: केंद्र एका ठिकाणी अन् पत्ता दुसऱ्या शहरात! बी.एड. पाठोपाठ 'नीट'च्या हॉल तिकिटामध्येही चुका

जगदीश जोगदंड

पूर्णा : नॅशनल ईलिजिब्लिटी कम एंट्रन्स टेस्ट २०२३ (नीट) परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांमध्ये महाविद्यालय एका शहरात तर पत्ता मात्र अन्य शहराचा अशा गंभीर चुका झाल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)

त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. य़ाआधी नुकत्याच झालेल्या बी.एड.च्या सीईटी परीक्षेतही गोंधळ झाला होता.

येत्या रविवारी (ता. सात) नीटची परीक्षा आहे. यावर्षी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचे राज्यात विविध ठिकाणी केंद्र आहेत. राष्ट्रीय आयुर्मान आयोग अर्थात मेडिकल नॅशनल मेडिकल कमिशन आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्यामार्फत ही परीक्षा घेतली जाते.

पूर्णा शहरातील श्री गुरू बुद्धी स्वामी महाविद्यालयात परीक्षा केंद्र असून, या केंद्राचा क्रमांक ३११२३३ असा आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यातील परीक्षार्थी या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी येणार आहे. हे महाविद्यालय पूर्णा शहरातील आहे तर महाविद्यालयाचा पत्ता मात्र परीक्षेच्या हॉल तिकिटावर पूर्णा रोड, विद्यानगर, हिरो शोरूम जवळ नांदेड महाराष्ट्र असा टाकण्यात आला आहे.

त्यामुळे परीक्षार्थींचा मोठा गोंधळ उडणार आहे. अनेक परीक्षार्थी नांदेड शहरात जातील व तेथे मात्र त्यांना हे महाविद्यालय आढळून येणार नाही. अशावेळी नांदेडहून पूर्णा येईपर्यंत त्यांचा मोठा वेळ जाईल धावपळ होईल.

काही विद्यार्थ्यांची परीक्षासुद्धा बुडू शकते. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट पुन्हा तयार करून अचूक पत्ता त्यावर टाकण्याची व ते परीक्षार्थींना पुन्हा पाठविण्याची गरजेचे आहे; अन्यथा अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल.

"ज्या विद्यार्थ्यांना बुद्धी स्वामी महाविद्यालयात, विद्यानगर, हिरो शोरूमजवळ, पूर्णा रोड, नांदेड हे सेंटर आले आहे. त्यांनी कृपया लक्षात घ्यावे की हे महाविद्यालय पूर्णा (जिल्हा परभणी) शहरात आहे.

नीटच्या ॲडमिट कार्डवर पत्ता चुकला आहे. गोंधळून जाऊ नये. मी हा पत्ता शोधत नांदेड येथील पूर्णा रोडला फिरून फिरून थकल्यावर अनेकांना विचारले. शेवटी या नावाचे महाविद्यालय नांदेडमध्ये नसल्याचे निष्पन्न झाले. हा पत्ता पूर्णा शहरातील आहे. याचा शोध लागला."

- शिवाजीराजे पाटील, नांदेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT