Central Railway service disrupted for 13 hours
Central Railway service disrupted for 13 hours 
महाराष्ट्र

मध्य रेल्वेची सेवा 13 तास विस्कळीत 

सकाळवृत्तसेवा

मनमाड/इगतपुरी : मध्य रेल्वेच्या उंबरमाळी स्थानकात गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करणारी व्हॅन घसरून रेल्वे वाहतूक तब्बल 13 तास विस्कळीत झाली. परिणामी, नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचा ठिकठिकाणी खोळंबा झाला. तसेच, लोकल सेवाही ठप्प झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अखेर शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली. 

दुरुस्तीकामासाठी गुरुवारी रात्री उंबरमाळी स्थानकात अर्ध्या तासाचा ब्लॉक घेण्यात आला होता. ओव्हरहेड वायरचे निरीक्षण करणारी व्हॅन कसारा स्थानकातून कल्याणच्या दिशेने निघाली होती. ही व्हॅन उंबरमाळी स्थानकादरम्यान येताच रुळावरून घसरली. या अपघाताने अपमार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचा नाशिक, इगतपुरी, कसारा घाट, कसारा या ठिकाणी खोळंबा झाला. यादरम्यान पहाटे 4.25 वाजता कसाऱ्याहून मुंबईकडे निघणाऱ्या पहिल्या लोकलसह तीन लोकल रद्द करण्यात आल्या, तर मनमाड-मुंबई राज्यराणी, मनमाड-मुंबई पंचवटी आणि मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी या तीन एक्‍स्प्रेसदेखील रद्द करण्यात आल्या. 

एक्‍सप्रेस मार्गात बदल 
मुंबईहून येणाऱ्या सुपर एक्‍स्प्रेस, तपोवन एक्‍स्प्रेस, गीतांजली एक्‍स्प्रेस, काशी एक्‍स्प्रेस, मुंबई भागलपूर एक्‍स्प्रेस, मुंबई-लखनौ एक्‍स्प्रेस आदी गाड्या कल्याणवरून पुणे-दौंड-मनमाडमार्गे वळवण्यात आल्या. इगतपुरी रेल्वे स्थानकात मुंबईहून पहिली गाडी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गोदान एक्‍स्प्रेस आली. या अपघातामुळे कसारा ते आसनगावदरम्यानची वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. 

अपघाताचे नेमके कारण शोधून पुढील चौकशी केली जाईल. यात रेल्वे कर्मचाऱ्यांची चूक आढळल्यास कारवाई करण्यात येईल. 
- एस. के. जैन, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे, मुंबई 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT