Politics esakal
महाराष्ट्र बातम्या

संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

महाविकास आघाडी सरकार आहे की दगड, चंद्रकांत पाटीलांचा खोचक सवाल

सकाळ डिजिटल टीम

महाविकास आघाडी सरकार आहे की दगड, चंद्रकांत पाटीलांचा खोचक सवाल

आम्ही समाजाचे शोषण किंवा भ्रष्टाचार करुन घरं उभी केलेली नाहीत. केंद्रीय यंत्रणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयावरही आता सत्ताधाऱ्यांचा आक्षेप सुरु आहेत. त्यामुळे आता बाबासाहेबांनी लिहलेल्या घटनेवरही तुमचा विश्वास नाही का?, असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. हे सर्व पाहता खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हतबल होऊन हे पाहत आहेत, हे दुर्दैवी असल्याचा पलटवार पाटील यांनी केला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते यांची हातमिळवणी आहे. भाजपला महाराष्ट्रातील सरकार चालू द्यायचं नाही. त्यांना सरकार उद्धवस्त करायचं आहे, असं वक्तव्य राऊत यांनी केलं होत. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी प्रतित्युर दिलं आहे. ते म्हणाले, शिवेसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवेसेनीची वाट लावण्याचे कंत्राट घेतले आहे. एकही नेता त्यांनी सेनेत टिकू दिला नाही. सेनेतील दिग्गज नेते आज कुठे आहेत कुणाला माहिती नाही. आणि हे सर्व मुख्यमंत्री हतबल होऊन पाहतं आहेत हे दुर्दैव आहे, असेही ते म्हणाले आहेत.

एसटी कर्मचारी संपाविषयी ते म्हणाले, एसटीचा संप मिटला नाही तर एक लाख घरे उद्ध्वस्त होतील. या संपामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. अजित पवारांनी सगळे श्रेय घ्यावे, पण हा संप मिटवावा असे आवाहन त्यांनी केलं आहे. रेकॉर्ड ब्रेक करणारा हा एसटी संप असल्यानं काही निर्णय घेतला तर आमदार पळून जातील अशी महाविकास आघाडीला भीती आहे त्यामुळे ते कोणताही ठोस निर्णय किंवा भूमिका घेत नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tesla Roadster Video : 'हवेत उडणारी कार'? Elon Musk यांनी स्वप्न प्रत्यक्षात उतरवले; सेकंदात ६०ची स्पीड अन् ग्रॅव्हिटीची ऐशीतैशी...

Sunlight at Night: आता रात्रीही मिळणार सूर्यप्रकाश! अमेरिकेची कंपनी भारताच्या मदतीने अंतराळात पाठवणार ‘स्पेस मिरर’... कसं करणार काम?

Navi Mumbai: १० टक्के पाणीकपात हटणार, नवी मुंबईत २४ तास पाणीपुरवठा मिळणार; गणेश नाईकांची मोठी घोषणा

Marathi News Live Updates: निळवंडे धरणातून प्रवरा नदीत पाणी सोडले, उत्तर अहिल्यानगरमधील नागरिकांना मोठा दिलासा; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची आशा

Water Conservation: दुष्काळी धाराशिवला ‘एआय’चे वरदान! उसासाठी पाण्याचा भरमसाठ उपसा टळला; ७७० शेतकऱ्यांच्या प्रयोगाने बदलले चित्र

SCROLL FOR NEXT