पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर भुयार यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

राजू शेट्टीयांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यातील एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची गुरुवारला पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
Devendra Bhuyar Facebook Post
Devendra Bhuyar Facebook PostTeam eSakal
Updated on

राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यातील एकमेव आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांची गुरुवार हकालपट्टी करण्यात आली. काही दिवसांपासून राजू शेट्टी आणि देवेंद्र भुयार यांच्यात मतभेद असल्याचे बोलले जात होते. यावर आमदार देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सक्रिय नसल्याचा आरोप करत संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी देवेंद्र भुयार यांना घरचा रस्ता दाखवला. यानंतर देवेंद्र भुयार यांची फेसबुक पोस्ट (Facebook Post) चर्चेचा विषय राहलाय. “धन्यवाद’ अशा शब्दात देवेंद्र भुयार यांनी फेसबुरकवर पोस्ट केली आहे. (MLA Devendra Bhuyar's facebook post)

Devendra Bhuyar Facebook Post
बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी दहा गुण गमावणार

गुरूवारी देवेंद्र भुयार यांच्यावर राजू शेट्टी टीका करताना म्हणाले ज्या पोरावर विश्वास टाकला तो बिनकामाचा निघाला. देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सक्रिय नसल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केलाय.

Devendra Bhuyar Facebook Post
मुंबईकरांना मनोरंजन, योग, स्केटींग, सायकलिंगसाठी 'संडे स्ट्रीट'; पोलिसांचा उपक्रम

विधानसभेच्या निवडणुकीत देवेंद्र भुयार शेतकरी संघटनेचा एकमेव आमदार म्हणून ते निवडून आले. त्यावेळी एका आमदाराला मंत्रीपद मिळावं यासाठी खासदार राजू शेट्टी यांची आग्रह भूमिका होती. मात्र देवेंद्र भुयार यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्यात आणि पक्षातील वरीष्ठ फळीत खटके उडत असल्याचे बोलले जात होते.

आमदार झाल्यानंतर देवेंद्र भुयार यांची इतर पक्षांशी जवळीक वाढत होती. यासोबतच अनेक अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने मध्यंतरी पत्रकार परीषदेत विदर्भ अध्यक्ष दामू अण्णा यांनी देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी केली होती. यावरुनच गुरुवारला राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांना घरचा रस्ता दाखवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Drugs
sangola, shelakewadi zp school
Deccan Police have registered a case after an unemployed youth was allegedly cheated of Rs 20 lakh on the promise of a government job in Pune.
Speaking at Sakal Bhakti Shakti Vyaspeeth, Dr More highlighted the contribution of saints in shaping Maharashtra's social and cultural legacy.
Marathi News Esakal
www.esakal.com