'आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह काढू अन् तो...', संजय राऊतांचा भाजपला इशारा

Sanjay Raut Warned BJP
Sanjay Raut Warned BJPe sakal
Updated on

मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात आज संजय राऊत (Sanjay Raut) पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. नागपूर दौऱ्यानंतर पेनड्राईव्ह बाळंत झाले आहेत. यांच्या घरात पेनड्राईव्ह बाळंत होतात का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. तसेच आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह काढू तो भाजपला (BJP) भारी पडेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Sanjay Raut Warned BJP
Video: आमच्या वडापावच्या गाडीवर पण ईडी कारवाई करेल- संजय राऊत

...मग तुमचा महाराष्ट्रद्रोही आत्मा शांत होईल -

केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते यांची हातमिळवणी आहे. भाजपला महाराष्ट्रातील सरकार चालू द्यायचं नाही. त्यांना सरकार उद्धवस्त करायचं आहे. तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिल्या. ज्यांना तुरुंगात टाकायचं आहे त्यांची यादी तयार करा आणि केंद्रीय तपास यंत्रणांना सांगा. त्यानंतर आम्हा सर्वांना एकदाच तुरुंगात टाका. त्यानंतर आमच्यावर आरोप लावा. मग तुमचा महाराष्ट्र द्रोही आत्मा शांत होईल, असा जोरदार निशाणा राऊतांनी लगावला.

कूपद्धतीचं घाणेरड्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे. सूड आणि बदल्याचं राजकारण आहे. असं राजकारण महाराष्ट्रात कधीही झालं नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शत्रूशी सन्मानाने वागण्याचा सल्ला दिला होता. आमचा महाराष्ट्र राजा-महाराजांचा, साधू-संताचा आहे. इथं असं राजकारण होत नव्हतं. आम्ही पाकिस्तानातून आलोय का? उलट तुमचे संबंध आहेत. यांच्या घरात पेनड्राईव्ह बाळंत होतात का? आम्ही खटकन एकच कव्हर ड्राईव्ह मारू आणि तो देखील भाजपला भारी पडेल, असा इशारा संजय राऊतांनी भाजपला दिला.

नागपूर दौऱ्यानंतर पेनड्राईव्ह बाळंत झाले आहेत. पण, माझे नागपूर आणि विदर्भाचे दौरे थांबणार नाही. भाजप रोज एक खोट प्रकरण तयार करतं. यांना पेनड्राईव्हचं बाळंतपण कसं काय जमतं माहिती नाही. पेनड्राईव्ह टेस्ट ट्युब बेबी आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच तुम्ही लोकांच्या घरात घुसू नका, तुम्हालाही घर आहेत, असा इशारा त्यांनी भाजपला दिला. इतकंच नाहीतर मोदी सरकार अल कायद्याचा अजेंडा राबवत असल्याचा आरोपही राऊतांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why are farmers opposing Shaktipeeth Highway?
Maharashtra Latest Marathi News Live Update
 Tukaram Mundhe
Conservation Success Story: Vulture Covers 3,334 Km from Maharashtra to Rajasthan
Marathi News Esakal
www.esakal.com