पेट्रोल
पेट्रोल 
महाराष्ट्र

'राज्य सरकारनं कर कमी केला तर इंधनाचे दर नियंत्रणात राहतील'

नामदेव कुंभार

राज्यात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोलच्या दरांनं शंभरी पार केली आहे तर डिझेलनं शंभरीकडे वाटचाल सुरु केली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंधनावीर टॅक्स केंद्र सरकारनं कमी करावेत, असं म्हटलं होतं. आज, सोमवारपासून इंधन दरवाढीविरोधात राज्यात काँग्रेसनं आंदोलन छेडलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

इंधन दरवाढीसाठी सरसकट केंद्राकडे बोट दाखवणं चुकीचं आहे. राज्य सरकारनं कर कमी केला तर इंधनाचे दर नियंत्रणात राहीतल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्ष काय प्रतिक्रिया देतोय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने 100 रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल 93 रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल 100 रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही 900 रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे.

1000 ठिकाणी काँग्रेसचं आंदोलन..

इंधनातील दरोडेखोरी विरोधात सोमवारी सकाळी ११ वाजता राज्यभर एकाचवेळी एक हजार ठिकाणी, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान तीन पेट्रोल पंपांवर आंदोलन करून मोदी सरकारचा तीव्र निषेध केला जाणार, असल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : पूरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

SCROLL FOR NEXT