
मुरादाबादमध्ये रस्त्यावर एका महिलेचा विनयभंग करणारा व्हिडीओ व्हायरल झाला, ज्याने संतापाची लाट पसरली.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या या घटनेत आरोपीने महिलेला मिठी मारून चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला.
पोलिसांनी तपास सुरू केला असून, महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Woman Harassment Video : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे, ज्याने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. रस्त्यावरून एकटीने चालणाऱ्या महिलेवर एका तरुणाने पाठीमागून येऊन मिठी मारली आणि तिचा विनयभंग केला. या लज्जास्पद कृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो पाहून प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या घटनेने समाजात संतापाची लाट पसरली असून, महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.