महाराष्ट्र

चिकन, मटणाला महागाईची फोडणी

सकाळवृत्तसेवा

नागपूर : लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढू लागला असताना मांसाहार विक्रेत्यांनी चिकन-मटणाच्या दरात वाढ करून खवय्यांना घाम फोडला आहे. मटणाचे दर किलोमागे 40 ते 50 रुपयांनी वाढविण्यात आले आहेत, तर चिकनच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ केली आहे.

शहरातील तापमानात वाढ होत असताना निवडणुकीचे वारेही गरम होऊ लागले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या पंगती वाढल्या असून, त्यांचा मांसाहारावर अधिक भर आहे. वाढलेली मागणी लक्षात घेता व्यापाऱ्यांनीही संधीचे सोने करण्यासाठी मटण आणि चिकनच्या दरात वाढ केलेली आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे मात्र बजेट विस्कळित झालेले आहे. निवडणुकीच्या तोंडावर मटण आणि चिकनला महागाईची फोडणी पडली आहे. 
नववर्षाला ब्रॉयलर कोंबड्यांची जास्त विक्री होते. त्या दिवशी हॉटेलवाल्यांकडून कोंबड्यांना मोठी मागणी असते. मटणाच्या भावात धुळवडीपासून वाढ झालेली आहे. पूर्वी 460 रुपये किलो असलेले मटण आता 500 ते 520 रुपये प्रतिकिलोवर पोहचले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रातील बकऱ्यांची मागणी अधिक आहे. महाराष्ट्रातील बकऱ्यांच्या मटणाला प्रतिकिलो चार ते पाच हजार रुपये दर मिळतो, असे पी. जी. पोल्ट्री फॉर्मचे संचालक प्रवीण बावणे यांनी सांगितले. 

हिवाळ्यात मटण आणि चिकनची मागणी अधिक असते. मात्र, उन्हाळ्यात मागणीत घट होते. मात्र, आता देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने यंदा मटण आणि चिकनची मागणी अचानक वाढलेली आहे. उन्हाळ्यात मटण पचण्यास अधिक गरम असल्याने ग्राहक खरेदी करीत नाहीत. त्यामुळे मटण आणि चिकन उत्पादकही उत्पादन कमी करीत असतात. उन्हाळ्यातच निवडणुकीचा रंग चढल्याने मटण आणि चिकनची मागणी वाढल्याने भाव वधारले आहेत.

मागणी वाढल्याने मटण उत्पादकही अधिक उत्पादन वाढविण्यासाठी आवश्‍यक असलेल्या सुविधा तयार करीत आहेत, असे पोल्ट्री फॉर्मचे संचालक स्वप्निल चौधरी यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT