Uddhav Thackeray  e sakal
महाराष्ट्र बातम्या

कौतुकाची थाप देण्याचा दिलदारपणा विरोधकांमध्ये नाही - उध्दव ठाकरे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'सर्वांसाठी पाणी' नवे धोरण जाहीर करण्यात आलं आहे. या योजनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

मुख्यमंत्री म्हणाले की, तुमचं आयुष्य तुमच्या मताच्या रुपातून आमच्याकडे सोपवत असता, त्यानंतर सरकार नालायक निघत असेल तर तुम्हाला हक्क आहे, त्याचा जाब विचारण्याचा हक्क तुम्हाला आहे. सर्वत्र चित्र दिसतंय की एकतर काम करू द्यायचं नाही, आणि काम केलं असेल तर बोंबलत सुटायचं की भ्रष्टाचार झाला. बाकीचे भ्रष्टाचारी आहेत हा आव आणला जातोय ते भयानक आहे. राजकारण जरूर करा पण त्याला दर्जा असावा असे मुख्यमंत्री म्हणाले.

फक्त विरोध करणं म्हणजे विरोधक नाही, तुमच्याकडून सूचना आल्या पाहिजेत. सरकार चूकत असेल तर कान उपटा पण चांगलं काम करत असेल तर तुमच्याकडे दिलदारी पाहिजे, जी आपल्या विरोधकांकडे नाहीये, जे सरकारणं चांगलं काम केलं आहे असं म्हणतील, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

१४ तारखेची सभा म्हणजे इकडे-तीकडे वार असं नाही करणार, जे काही मनामध्ये आहे ते मी बोलणार आहे, काही तुंबलेलं नाहीये पण मनामध्ये जे काही आहे. त्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. मनमोकळ्या गोष्टी नक्की बोलेन असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update: पुणेकरांनो, उद्या 'या' मार्गाने जाऊ नका; ईद मिरवणुकीमुळे वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग जाहीर

IND vs SL 2nd Test: यशस्वी जैस्वाल-असिथा फर्नांडो वादाचा नवा खळबळजनक Video समोर! ICC वर गंभीर आरोप... नेमकी 'ढुशी' मारली कोणी?

संकटात धावून आला ‘लालबागचा राजा’! भुलेश्वरचा राजा मंडळाला ११ लाख, तर मृतांच्या कुटुंबीयांनासाठीही आर्थिक मदत जाहीर

प्राजक्ता माळीला 'फरसाण'वरून का चिडवलं जातं? अभिनेत्याने सांगितला हास्यजत्रेच्या सेटवरचा मजेशीर किस्सा

Marathi News Live Updates : ‘वन नेशन, वन इलेक्शन’वरून प्रियंका चतुर्वेदींचा केंद्रावर निशाणा

SCROLL FOR NEXT