The Chief Ministers helicopter flew away from Sangli
The Chief Ministers helicopter flew away from Sangli 
महाराष्ट्र

सांगलीहून जाताना मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर भरकटले

सकाळवृत्तसेवा

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची दिशा आज पुन्हा एकदा चुकली. सांगली जिल्ह्याचा प्रशासकीय आढावा घेण्यासाठी आज त्यांनी सलग चार तास मॅरेथान बैठक घेतली. त्यानंतर दुपारी सव्वाचारच्या सुमारास सांगलीतील कवलापूरच्या मैदानातून ते कडोली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यासाठी निघाले होते. त्यादरम्यान हेलिकॉप्टर भरकटले.

या हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांसमवेत सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार होते. सिग्नल मिळत नसल्याने हेलिकॉप्टर कोल्हापूर शहरावर घिरट्या मारत होते. त्यानंतर हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या पृथ्वीराज देशमुख यांनी पायलटला मदत केली. वाठारकडून कडोलीची दिशा पायलटला दिली. ते वारणा येथील हेलिपॅडवर उतरले. नियोजित वेळेपेक्षा अर्धातास उशिरा कार्यक्रमस्थळी पोचले. त्यानंतर मेळावा उत्साहात पार पडला. हेलिकॅप्टरची दिशा चुकल्याबाबत पृथ्वीराज देशमुख यांनीच या माहितीस दुजोरा दिला. 

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याच्या व दुर्घटना होत असताना सावरल्याचे प्रकार यापूर्वीही घडले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये विशेष काळजी घेतली जाऊ लागली. हेलिपॅडची निवड करतानाही याबाबत फार दक्षता घेतली जात असतानाच पुन्हा असा प्रकार आज अनुभवास आल्याने यंत्रणेची थोडी तारंबळ उडाली. मात्र, मुख्यमंत्र्यांना सुखरुपपणे योग्य स्थळी उतरवण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT