Gram Panchayat Election Hingoli esakal
महाराष्ट्र बातम्या

Hingoli : सरपंच निवडीवरून दोन गटांत तुफान हाणामारी; ​​​​​​40 जणांविरुध्द गुन्हा, 3 पोलिस जखमी

पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर एका गटानं पोलिसांवरच दगडफेक केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर एका गटानं पोलिसांवरच दगडफेक केली आहे.

हिंगोली : ग्रामपंचायत निवडणुकीतील (Gram Panchayat Election) निकालानंतर हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli) एका गावात तणावस्थिती निर्माण झाली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली निळोबा येथील रात्री उशीराची ही घटना आहे. निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने एक गट आक्रमक झाला. त्यानंतर दुसऱ्या गटाकडूनही वादास सुरुवात झाली.

औंढा नागनाथ तालुक्यातील (Aundha Nagnath Taluka) चिंचोळी निळोबा इथं ग्रामपंचायतीच्या (Chincholi Niloba Gram Panchayat) 9 सदस्यांसाठी निवडणूक झाली. यामध्ये दोन गटांचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सोमवारी औंढा तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. यामध्ये रवंदळे गटाचे 5, तर गरड गटाचे 4 सदस्य विजयी झाले. मात्र, सरपंचपदाच्या निवडीमध्ये गरड गटाचा उमेदवार विजयी झाला. सदस्यांचे बहुमत एका गटाकडं तर थेट निवडीतून सरपंच दुसऱ्या गटाचा झाल्याने घोषणाबाजीला सुरुवात झाली. दरम्यान, पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ झुंजारे यांनी गावात जाऊन मिरवणूक न काढण्याबाबत सूचना दिली. त्यानंतरही दोन्ही गटांनी मिरवणूक काढली. त्यातून दोन गट समोरासमोर आल्यानंतर चांगलाच राडा झाला.

दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर एका गटानं पोलिसांवरच दगडफेक केली. यामध्ये पोलिस कर्मचारी रवी इंगोले, वसीम पठाण, राजकुमार कुटे जखमी झाले. त्यानंतर वाढीव पोलिस कुमक मागविण्यात आली. या प्रकरणी 40 जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी मंगळवारी पहाटे औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

पोलिस कर्मचारी रवी इंगोले यांच्या तक्रारीवरून औंढा पोलिसांनी नंदकिशोर रवंदळे, संजय भोपे, रुस्तुम वैद्य भगवान भिसे, गंगाधर वैद्य, केशव मोरे, विठ्ठल वैद्य, रामा वैद्य, अण्णा पारडकर, सुंदर वैद्य, जगन्नाथ वैद्य, श्रीराम वैद्य, ज्ञानेश्‍वर राऊत, रामभाऊ बनसोडे, विजय जाधव, विजय रवंदळे, पुंजाजी रवंदळे, रामभाऊ वैद्य, नारायण रवंदळे, ज्ञानदेव रवंदळे, तानाजी दंडवते, दामू वैद्य, कृष्णा मोरे, पप्पू वैद्य, गोविंद वैद्य यांच्यासह 15 जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: ऑस्ट्रेलियाचे स्वप्न भंगलं! इंग्लंडच्या संघाने दणदणीत विजयासह गाठली फायनल; कर्णधार चमकले

NCP: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पांडुरंग पवार यांचं प्राथमिक सदस्यत्व रद्द; पक्षविरोधी काम केल्याचा ठपका

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात चार घरफोडीच्या घटना

Pune Crime : शिवाजीनगर परिसरात एटीएमजवळ तरुणाला लुटले, २८ हजारांची रोकड चोरी

T20 World Cup: 'हा डेंजर संघ आहे...' Dhoni सूर्याच्या टीम इंडियाबद्दल स्पष्टच बोलला; मनातील भीतीही सांगितली

SCROLL FOR NEXT